Palghar Lok Sabha Election 2024 Result : भाजपने ठाकरेंचा उमेदवार पाडला, महाराष्ट्रात मिळवला पहिला विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

palghar lok sabha election 2024 bjp candidate dr hemant savara won the seat udhhav thackeray candidate bharti kamdi and bahujan vikas aghadi rajesh patil lose seat
पालघर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार डॉ. हेमंत सवरा विजयी ठरले आहे.
social share
google news

Palghar Lok Sabha Election 2024 Result : पालघर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार डॉ. हेमंत सवरा विजयी ठरले आहेत. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी एक्सवर पोस्टकरून याबाबतची माहिती दिली आहे. या विजयाने पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे. (palghar lok sabha election 2024 bjp candidate dr hemant savara won the seat udhhav thackeray candidate bharti kamdi and bahujan vikas aghadi rajesh patil lose seat)  

पालघर लोकसभा मतदार संघात तिरंगी लढच होती. भाजपने माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली होती. उद्धव ठाकरेंनी भारती कामडी यांना उमेदवारी दिली होती. आणि बहुजन विकास आघाडीने राजेश पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या मतदार संघात आता  डॉ. हेमंत सवरा यांनी ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीचा पराभव करत विजय मिळवला आहे. 

रविंद्र चव्हाण यांचं ट्विट जशाच्या तसा

आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सवरा हे प्रचंड बहुमतांनी विजयी झाले आहेत. यासाठी डॉ. हेमंत विष्णू सवरा यांचे सहर्ष अभिनंदन ! विकसित भारताच्या निर्मितीसाठी आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट केल्याबद्दल महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार !

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT