Sam Pitroda : काँग्रेसची पित्रोदांमुळे पंचाईत! शाह संतापले; म्हणाले, "काँग्रेसचे पितळ उघडे पडलेय"
Sam Pitroda's statement : काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. सॅम पित्रोदांच्या विधानामुळे काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सॅम पित्रोदा यांच्या विधानामुळे वाद

अमित शाह यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

सॅम पित्रोदा काय बोलले?
Amit Shah On Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आता अमित शाह यांनी संताप व्यक्त केला असून, पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे, असे ते म्हणाले. (Congress leader Sam Pitroda's statement has sparked a political storm. )
काँग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात आता सॅम पित्रोदा यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमित शाह म्हणाले, 'जेव्हा मोदीजींनी हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा संपूर्ण काँग्रेस, राहुल गांधी, प्रियांका गांधी बॅकफूटवर आली. मला विश्वास आहे की काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा मागे घेईल.'
अमित शा पुढे म्हणाले, 'आज सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे हेतू देशासमोर आला आहे. आधी त्यांच्या जाहीरनाम्यात 'सर्वेक्षणा'चा उल्लेख, मनमोहन सिंग यांचे जुने विधान जे काँग्रेसचा वारसा आहे. देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे आणि आता संपत्तीच्या वाटपावर अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा यांची टिप्पणी यावर चर्चा व्हायला हवी.'
काँग्रेसला मालमत्ता सरकारी तिजोरीत टाकायचीये
अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा म्हणाले की, 55 टक्के संपत्ती सरकारी तिजोरीत जाते. आज सॅम यांनी काँग्रेसचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांना लोकांची वैयक्तिक संपत्ती सरकारी तिजोरीत टाकायची आहे आणि ती अल्पसंख्याकांना वाटायची आहे.