VBA: तिसऱ्या यादीसोबत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, थेट बारामतीतच पवारांना...

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

prakash ambedkar vanchit bahujan agahdi declare there third list vasant more pune lok sabha support sharad pawar supriya sule baramati
वंचितने मनसे पक्षाचा राजीनामा दिलेल्या वंसत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे.
social share
google news

Prakash Ambedkar Declare Third List : लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने 5 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये वंचितने मनसे पक्षाचा राजीनामा दिलेल्या वंसत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. त्याचसोबत प्रकाश आंबेडकरांनी बारामतीतून शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान कोणकोणत्या पाच जागांवर आंबेडकरांनी उमेदवारी जाहीर केली आहे. हे जाणून घेऊयात.  (prakash ambedkar vanchit bahujan agahdi declare there third list vasant more pune lok sabha support sharad pawar supriya sule baramati)

ADVERTISEMENT

शरद पवारांना पाठिंबा 

प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या तिसऱ्या यादीत बारामतीतून उमेदवार जाहीर केलेला नाही. याउलट या जागेवर प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीतून शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीला वंचितचा पाठिंबा असणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. या लढतीत आता वंचितच्या पाठिंब्याचा सुप्रिया सुळे यांना किती फायदा होतो. हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.  

हे ही वाचा : Narayan Rane : ''लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार''

'वंचित'ची तिसरी यादी 

नांदेड - अविनाश बोसीकर -लिंगायत
परभणी-बाबासाहेब भुजंगराव उगले -मराठा
औरंगाबाद - अफसार खान- मुस्लिम
 पुणे - वसंत मोरे - मराठा 
शिरूर- मंगलदास बगूल- मराठा 

मनसेला जय महाराष्ट्र करून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी उमेदवारी मिळाली आहे. वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर आता लोकसभा लढवणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा : शिंदेंच्या दोन खासदारांचा 'गेम'; आधी दिले तिकीट, आता बदलणार उमेदवार?

 

ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी 

हिंगोली- डॉ. बी. डी चव्हाण
लातूर - नरसिंह राव उदगीरकर
 सोलापूर - राहुल गायकवाड
 माढा - रमेश बारस्कर 
 सातारा- मारूती जानकर 
 धुळे- अब्दुर रहमान 
 हातकणंगले- दादासाहेब अका दादागौडा चौगडा पाटील
 रावेर - संजय ब्राम्हणे 
 जालना- प्रभाकर बाकले 
 मुंबई नॉर्थ सेंट्रल - अबुल हसन खान 
 रत्नागिरी-सिंधुदुर्ग - काका जोशी 

पहिली यादी 

अकोला- प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोदिया- संजय केवट
गडचिरोली- हितेश मडावी
 चंद्रपुर- राजेश बेले 
 बुलढाणा- वसंत मगर 
अमरावती- प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा- राजेंद्र साळुंके 
यवतमाळ-वाशिम- खेमसिंग पवार   

वंचितने पहिल्या लोकसभेच्या उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश होता. तर दुसऱ्या उमेदवार यादीत 11 जणांचा समावेश आहे. आता वंचितने तिसऱ्या उमेदवारी यादीत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे 24 उमेदवार जाहीर केले आहेत. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT