Narayan Rane : ''लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार''

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

narayan rane big allegation on sanjay raut and criticize uddhav thackeray rahul gandhi lok sabha election 2024 maharashtra politics
संजय राऊतांमुळे शिवसेना संपणार आहे.
social share
google news

Narayan Rane Criticize Sanjay Raut : 'लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही. कारण तो गुपचूप लोकांना भेटत असतो. संजय राऊत फक्त शरद पवारांशी एकनिष्ठ आहे. तो पक्षाशी एकनिष्ठ नाही. त्यामुळे संजय राऊतांमुळे (Sanjay Raut) शिवसेना संपणार आहे, असे खळबळजनक विधान नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे.  (narayan rane big allegation on sanjay raut and criticize uddhav thackeray rahul gandhi lok sabha election 2024 maharashtra politics) 

इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या महारॅलीत विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. मोदींवरील याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. 

हे ही वाचा : शिंदेंच्या दोन खासदारांचा 'गेम'; आधी दिले तिकीट, आता बदलणार उमेदवार?

 ''संजय राऊत हा पवार साहेबांशी एकनिष्ठ आहे, हा पक्षाशी नाही. दिल्लीत ज्या ज्या वेळेला मी पवार साहेबांच्या ऑफिसच्या बाजूने जायचो, त्या त्या वेळेला हा आतमध्ये बसलेला असायचा.  उद्धव ठाकरेला हा आज ना उद्या फसवणार आहे. तसेच जी शिवसेना संपली आहे ना त्याला कारणीभूत देखील संजय राऊत असल्याचा'' आरोप नारायण राणे यांनी केला आहे. ''लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाहीत. तो गुपचूप लोकांना भेटत असतो, तुम्ही (मीडिया) शोधून काढला पाहिजे'', असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. 
 
'' राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे जर तुम्ही पंतप्रधान मोदी आणि अमित शंहांबाबत असे बोलत राहिलास, तर इटलीपासून भारतापर्यंत सगळे पुरावे देईन, अशी धमकी नारायण राणे यांनी दिली आहे. सध्या तुम्हाला संरक्षण आहे आणि म्हणून दिल्लीपर्यंत पोहोचता. पण एकदा सुरक्षा काढून घेतली की तुम्ही मातोश्रीच्या बाहेर देखील पडू शकणार नाही'', असे नारायण राणे यांनी इशारा दिला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : ''शिंदेंनी शपथ घेतलीये 13 खासदारांना...'',

 तसेच ''माझ्याकडे एक यादी आहे, पैसे घेऊन त्यांनी तिकीट दिले आहेत. पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही. एकदा त्याने व्यावसायिकाकडून 50 लाख घेतले आणि तिकीट दुसऱ्याला दिले. मी साहेबांना (बाळासाहेब) कळवले. कोणतीही नोकरी-व्यवसाय न करता तो मर्सिडीजमध्ये कसा फिरतोय. त्यांनी मातोश्री 2 कशी बांधली'', असे खळबळ उडवून टाकणारे आरोपही नारायण राणे यांनी केले आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT