Pune Accident: 'पोलिसांनाही धक्का बसला...', पुण्यातील 'त्या' अपघाताबाबत फडणवीस असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra Fadnavis on Pune Accident: पुणे: पुण्यातील प्रसिद्ध उद्योजका विशाल अग्रवाल (Vishal Agarwal)याच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे या गाडीने दोघांना धडक देत चिरडलं. ज्यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, यानंतर बाल न्याय मंडळाने या मुलाची जामिनावर सुटका करताना काही अटी समोर ठेवल्या होत्या. ज्या अत्यंत क्षुल्लक असल्याची टीका होऊ लागली. या प्रकरणावर राज्य सरकारवरही टीका होताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. (pune porsche car accident why did home minister devendra fadnavis say that the police were also shocked regarding accident caused by a minor in pune)

यावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केलं की, दुर्दैुवाने बाल न्याय मंडळाने त्यात वेगळी भूमिका घेतली. या प्रकरणात ज्या प्रकारचे त्यांनी आदेश दिले त्यामुळे पुणे पोलिसांनाही धक्का बसला. आता या प्रकरणी आरोपीला प्रोढ म्हणून कोर्टापुढे सादर केलं जावं अशा स्वरुपाची केस तयार करण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले..

पाहा पुण्यातील अपघातावरनंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले... 

'गाडी चालवत असताना अपघात केला आणि दोन लोकांचा यांचा मृत्यू झाला.. त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये संताप, नाराजी ही पाहायला मिळाली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी 304 कलम हे लावला आहे. आणि स्पष्टपणे लिहलेलं आहे की, हा जो मुलगा आहे तो 17 वर्ष 8 महिन्यांचा आहे..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'निर्भया प्रकरणानंतर जी काही दुरुस्ती झाली त्यानुसार 16 वर्षांच्या वरील जी मुलं असतील त्यांना गंभीर प्रकरणात अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं.' 

'अतिशय स्पष्टपणे मुद्दा मांडलाय. त्याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरा.. 304 A नाही तर 304 च आहे अशाप्रकारे त्या ठिकाणी पोलिसांनी तसंच केलं होतं. पण दुर्दैुवाने बाल न्याय मंडळाने त्यात वेगळी भूमिका घेतली आणि प्रौढ म्हणून ग्राह्य धरण्याचा जो अर्ज होता तो बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी अतिशय सौम्य पद्धतीने याकडे पाहत.. 15 दिवस समाजकार्य करा अशाप्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहल्या.'

ADVERTISEMENT

'खरं तर हा पोलिसांसाठी देखील धक्का होता. कारण अशाप्रकारच्या प्रकरणात जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये आहे, काय केलंय.. गाडीच्या संदर्भातील पुरावे दिले आहेत. वयाचे पुरावे दिले आहेत. या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की, बाल न्याय मंडळाने जी काही भूमिका घेतली ही नागरिकांच्या आणि शासनाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे.' 

'तात्काळ यासंबंधी वरच्या कोर्टात अर्ज गेला आणि ती याचिका पाहिल्यानंतर कोर्टाने सांगितलं की, या संदर्भात तुम्हाला बाल न्याय मंडळाकडेच जावं लागेल. कारण त्या कायद्यामध्ये त्यांचा ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे. पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर तुम्हाला आमच्याकडे येता येईल.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> संभाजीनगरची तनिशा राज्यात अव्वल, बारावीत मिळवले 100 पैकी 100 मार्क

'त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्यासाठी गेली आहे. कदाचित आज किंवा उद्या त्यावर बाल न्याय मंडळाची जो काही निर्णय असेल ती अपेक्षित आहे. मला असं वाटतं की, वरच्या कोर्टाची भूमिका बघता ते योग्य ऑर्डर देतील. पण तशी दिली नाही तर वरच्या कोर्टात पुन्हा पोलीस जातील.' 

'पोलिसांनी ठरवलंय की, कोणालाही दारू पिऊन,  विनानंबरची गाडी चालविण्याची परवानगी नाही. यामुळे जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी आहे.' 

'एक तर ज्यांनी प्रोढ नसलेल्यांना दारू दिली मला असं वाटतं की, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यांना कोर्टाने चार दिवसांची रिमांड दिली आहे. याशिवाय जो मुलगा आणि त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

'कारण आपला मुलगा सज्ञान नसूनही त्याला गाडी देणं हा गुन्हा आहे. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे. पुढची कारवाईही पोलीस करतील. या प्रकरणाला पोलिसांनी गंभीरतेने घेतली आहे.'

हे ही वाचा>> बिल्डरपुत्राच्या बचावासाठी आमदाराचा दबाव? आरोपांवर सुनील टिंगरेंनी दिलं स्पष्टीकरण

'अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन त्यात आरोपीला सोडून देणं हे काही सहन केलं जाणार नाही. त्यावर उचित कारवाई केली जाईल. त्यात न्याय मिळेल.' 

'यासोबत पालकांनाही माझं निवदेन आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. या केसमध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्यांदाच पालकांच्या विरुद्ध जी काही तरतूद आहे ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं काम केलं पाहिजे.' असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT