Lok Sabha Election 2024 : सुनबाईंसमोर खडसेंची माघार! पवारांसोबतच्या बैठकीनंतर काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

raksha khadse raver lok sabha constituency rohini khadse ekanth khadse sharad pawar meeting lok sabha election 2024
एकनाथ खडसे यांनी मुलीसह निवडणुकीतुन माघार घेतल्याची घोषणा केली. त
social share
google news

Raksha Khadse Vs Rohini Khadse, Raver Lok Sabha Constituency : मनीष जोग, जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठे नेते एकनाथ खडसे यांना कोंडीत केल्याचे बोलले जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (rohini khadse) यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे रावेरमध्ये नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होण्याची शक्यता होती. मात्र आज एकनाथ खडसे यांनी मुलीसह निवडणुकीतुन माघार घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे सुनबाईंसाठी खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता रक्षा खडसेंचा मार्ग मोकळा झाला आहे. (raksha khadse raver lok sabha constituency rohini khadse ekanth khadse sharad pawar meeting lok sabha election 2024) 

रावेर लोकसभेच्या जागेवरून आज एकनाथ खडसे यांची शरद पवारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी एकनाथ खडसे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र एकनाथ खडसे यांना निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची आतली माहिती आहे. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. 

हे ही वाचा : फडणवीसांनी पुन्हा दिलं दाखवून.. तेच महाराष्ट्र BJP चे बॉस!

पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "मी आणि माझी मुलगी रोहिणी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही. माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही. तर माझी मुलगी मुक्ताईनगरमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करते आहे. त्यामुळे आम्ही दोघेही लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.  शरद पवार यांनी रावेरमधून उमेदवारी जाहीर करावी. आम्ही उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देऊ आणि त्यांचा विजय होईल याची खात्री करू, असे देखील खडसे म्हणालेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान जागावाटपावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "सर्व 48 जागांवर आमची चर्चा जवळपास संपली आहे. फक्त 4 ते 5 जागांवरच चर्चा बाकी आहे. पुढील एक-दोन बैठकांमध्ये त्यावर तोडगा निघेल. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि आपल्या देशात इंडिया आघाडीचा विजय होईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : निवडणूक रोख्यांची माहिती देताना SBIने युनिक कोड का लपवले?

रावेर लोकसभा मतदासंघांत खडसेंची सून रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपल्या विरोधात सुनबाई रक्षा खडसेचं असल्याच कारणाने आता एकनाथ खडसेंनी लोकसभेतून माघार घेतल्याची चर्चा आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT