Ravindra Waikar : ठाकरेंकडून आलेल्या नेत्याला शिंदेंनी दिले तिकीट, 'या' मतदारसंघातून लढणार

ऋत्विक भालेकर

Ravindra waikar mumbai north west lok sabha

ADVERTISEMENT

रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रवींद्र वायकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

एकनाथ शिंदेंनी रवींद्र वायकर यांना दिली उमेदवारी

point

ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर लढवताहेत निवडणूक

Ravindra Waikar Mumbai North West Lok Sabha : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आलेल्या रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत रवींद्र वायकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असणार असून, ते मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. (Eknath Shinde's Shiv Sena Nominate Ravindra Waikar From Mumbai North west Lok Sabha)

एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी अलिकडेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून दोन नावांची चर्चा होती, यात वायकर यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडी होते. संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा होती, पण त्यांना अमराठी चेहरा असल्याने विरोध होता, अशी माहिती आहे. अखेर रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

भूखंड प्रकरणामुळे आले होते अडचणीत

खरंतर रवींद्र वायकर हे ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत जातील याची चर्चा त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर सुरू झाली होती. जोगेश्वरी येथील क्लबच्या जागेचा गैरवापर करून तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालेला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp