Sanjay Raut : ''तुमच्यात हिम्मत असेल तर...'', राऊतांचे थेट अजित पवारांना आव्हान
Sanjay Raut Criticize Ajit Pawar : तुमच्यावर धमक्या द्यायची वेळ का येतेय. कारण लोक तुमच्या सोबत नाही आहेत, असा शब्दात राऊतांनी अजित पवारांवर हल्ला चढवला. तसेच ही लढाई बारामतीची नाही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानची लढाई आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut Criticize Ajit Pawar : ''रोहित पवारांना, युगेंद्र पवारांना अडवून प्रचार करण्यास रोखले जातेय. पण तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमचा प्रचार करा आणि बारामतीत निवडून येऊन दाखवा'', असे थेट आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना दिले आहे. तसेच ''तुम्ही बारामतीत धमक्या देताय, पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा'', असा इशारा देखील राऊतांनी (Sanjay Raut) अजित पवारांना (Ajit Pawar) दिला आहे. (sanjay raut criticize ajit pawar baramati lok sabha election 2023 supriya sule vs sunetra pawar indapur farmer rally maharashtra politics)
ADVERTISEMENT
इंदापूरमधील शेतकरी मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यावेळी म्हणाले की, ''पराभवाची भीती वाटायला लागली, लोकं आपल्याला स्विकारणार नाहीत, याचं भय वाटायला लागलं की मोदींचा मार्ग सुरू होतो. धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. पण आम्हाला धमक्या नवीन नाही, आम्ही धमक्या देतो ही आणि धमक्या घेतो देखील. पण तुम्ही कोणाला धमक्या देताय, पवार साहेबांना की शिवसैनिकांना....नामर्द, डरपोक होते ते गेले पळून गेले'', अशा शब्दात राऊतांनी अजित पवारांच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलं.
हे ही वाचा : 'मी ठरवलं BJPसोबत जायचंय, तर..', आंबेडकरांचं मोठं विधान
''तुमची दादागिरी, तुमच्या धमक्या, पण तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमचा प्रचार करा आणि बारामतीतून निवडून येऊ दाखवा. तसेच तुमच्यावर धमक्या द्यायची वेळ का येतेय. कारण लोक तुमच्या सोबत नाही आहेत, असा शब्दात राऊतांनी अजित पवारांवर हल्ला चढवला. तसेच ही लढाई बारामतीची नाही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानची लढाई आहे. तुम्ही बारामतीत धमक्या देताय पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा आलो,पण दोन दोन पक्ष फोडून आलो. काय क्वालिफिकेशन? राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले, इमारती बांधल्या, रूग्णालये बांधली,मी लोकांचा जीवनमान उंचावलं म्हणून मी राजकारणात आहे. मी दोन दोन पक्ष फोडून आलो, चार महिन्यांनी देशाचे सरकार येणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसणार आहेत. ईडी,सीबीआय़च्या दहशतीवर तुम्ही पक्ष फोडले, उद्या या सगळ्या यंत्रणा आमच्या हातात येणार आहेत. तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पाहा? अशा इशाराच राऊतांनी देंवेद्र फडणवीसांना दिला.
हे वाचलं का?
हे ही वाचा : 'माझ्यासाठी त्यांनी अजूनही एक काम केलेलं नाही'; अमित ठाकरेंनी 'त्या' गोष्टीची व्यक्त केली खंत!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT