Sanjay Raut : "गुजरातची नवी आत्मा महाराष्ट्रात भटकतेय, कारण...", मोदींवर राऊतांचा पलटवार
PM Modi, Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी दिले उत्तर.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका
संजय राऊतांनी दिले प्रत्युत्तर
लोकसभेच्या प्रचारात 'भटकती आत्मा'वरून घमासना
Sanjay Raut PM Modi : "महाराष्ट्र भटकत्या आत्म्याचा शिकार झाला आहे", या पंतप्रधान मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर केलेल्या टीकेला राऊतांनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनाच गुजरातचा भटकता आत्मा असे संबोधत राऊतांनी पलटवार केला. (Sanjay Raut Hits back to PM Modi)
ADVERTISEMENT
मुंबई माध्यमांशी संजय राऊत यांनी संवाद साधला. त्यांनी मोदींनाच गुजरातची भटकती आत्मा असे म्हटले आहे. त्याचबरोबर "तुमच्यासारखा एकच भटकता आत्मा बसला पंतप्रधान पदावर, तर या राज्याची आणि देशाची भुताटकी होऊन जाईल. स्मशान होऊन जाईल", अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
Sanjay Raut : "गुजरातचे आत्मे महाराष्ट्रात भटकताहेत"
"औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा; जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांचे आत्म साडेचारशे वर्षांपासून भटकताहेत. जे मराठी माणसाचे शत्रू आहेत. ज्यांना महाराष्ट्राने गाडलं आहे, अशा सगळ्यांचे आत्म महाराष्ट्रात साडेचारशे वर्षांपासून भटकताहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले, आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्ये होत असली, तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही", असे उत्तर राऊतांनी मोदींना दिले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ठाकरेंकडून आलेल्या नेत्याला शिंदेंनी दिले तिकीट, 'या' मतदारसंघातून लढणार
"महाराष्ट्र ढोंग, अंधश्रद्धा, फेकाफेकी याला कधीही महाराष्ट्राने महत्त्व दिले नाही. महाराष्ट्र हा ज्याला पवित्र आत्मा म्हणतो, अशा लोकांचा प्रदेश आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, इथे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे", असे राऊत म्हणाले.
आंबेडकरांचं संविधान मोदींना बदलायचं आहे -राऊत
"काल मोदी पुण्यात होते ना... डॉ. आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख तरी केला का? कारण त्यांना आंबेडकरांवर राग आहे. त्यांना आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांचे आत्मे महाराष्ट्रात भटकताहेत. कारण डॉ. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, त्यांचं संविधान त्यांना बदलायचं आहे. आणि शिवसेना त्याविरोधात ठामपणे उभे आहे", असे राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
राऊतांचा घणाघात! "राज्याची आणि देशाची भुताटकी होईल"
"मोदी काय म्हणतात, त्याकडे फार लक्ष देऊ नका. ते सगळे भटकते आत्मे आहेत. पंतप्रधान पदासाठी पाच चेहरे असले, तर काय झालं? तुमच्यासारखा एकच भटकता आत्मा बसला पंतप्रधान पदावर, तर या राज्याची आणि देशाची भुताटकी होऊन जाईल. स्मशान होऊन जाईल", असे प्रत्युत्तर राऊत यांनी मोदींना दिले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "फोडायला अक्कल लागत नाही", फडणवीसांवर वार, पवारांनी काय सुनावलं?
भाजपप्रमाणे पंतप्रधान लादणार नाही -संजय राऊत
"आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत, पंतप्रधानपदासाठी आणि हे लोकशाहीतील चांगले आणि उत्तम उदाहरण आहे. लोकशाही प्रधान देशात पंतप्रधान पदासाठी एक चेहरा नाही, तर एकापेक्षा जास्त आणि उत्तम चेहरे आहेत. आम्ही भाजपप्रमाणे पंतप्रधान लादणार नाही", असे उत्तर संजय राऊत यांनी मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT