Sharad Pawar : "लाचारी करावी, पण...", पवारांनी पटेलांचे टोचले कान
Sharad Pawar Criticize Praful Patel : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ", असे म्हणत प्रफुल पटेल यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Criticize Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिरेटोप घालून सत्कार केला होता. पटेलांच्या या कृतीनंतर वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर या सर्व प्रकरणावर प्रफुल पटेल यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले होते.मात्र तरी देखील हा वाद शमला नाही आहे. कारण आज शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रफुल पेटलांवर (Praful Patel) जोरदार टीका केली आहे. (sharad pawar criticize praful patel wearing jiretop to pm narendra modi loksabha election 2024)
ADVERTISEMENT
शरद पवार नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी जिरेटोपाच्या वादावर प्रतिक्रिया दिली. 'जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो.लाचारी असते नाही असं नाही, पण लाचारीला काही मर्यादा असते. त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या होत्या, अशी टीका शरद पवार यांनी प्रफुल पटेलांवर केली. तसेच एक चांगले झालं की त्यांनी सांगितलं आम्ही पुन्हा काळजी घेऊ', असे शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा : मोदींचा रोड शो झालेल्या मतदारसंघात 'M' फॅक्टर ठरवणार निकाल
दरम्यान शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या रोड शोवर देखील टीका केली. मुंबईसारख्या शहरात रोड शो घेणे हे काय शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासंनतास थांबावं लागतं. वाहतूकीची समस्या गंभीर बनते. त्यांनी जो कार्यक्रम ज्या भागात घेतला. तो संपूर्ण गुजराती भाग आहे. पण मुंबईमध्ये अनेक मोठे रस्ते आहेत, तिकडे हा रोड शो करता आला असता. पण त्यांच लक्ष एका भागावरच होतो.त्यामुळे याचा लोकांना त्रास झाला आणि त्यांच्या तक्रारी आल्या,असे शरद पवार यांनी सांगितले.
हे वाचलं का?
प्रफुल पटेल काय म्हणाले?
"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ", असे म्हणत प्रफुल पटेल यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंनी कल्याण किंवा ठाण्यातून निवडणूक का लढवली नाही?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT