Sharad Pawar : अदाणी-अंबानीवरून मोदींना पवारांनी घेरलं, 'दोस्त तुमचे अन् काँग्रेसवर...'
Sharad Pawar On Adani-Ambani : मी असं म्हणालो नाही. असं मी म्हणालो नाही. अशा शब्दात विलीनीकरणावर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2000 पासून एकत्र काम करत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत. मंत्री मंडळातही एकत्र होतो. मागच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar On Adani-Ambani : ''अदाणी- अंबानीने टेम्पोने काळा पैसा काँग्रेसला दिल्याचा'' आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका प्रचारसभेत केला होता. या आरोपांवर राहुल गाधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत मोदींना जोरदार उत्तर दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या या काँग्रेसवरील टीकेला उत्तर दिले आहे. अदाणी-अंबानी कोणाचे दोस्त आहेत आणि आरोप काँग्रेसवर ढकलत आहेत, असा हल्ला शरद पवारांनी (Sharad Pawar) नाव न घेता मोदींवर चढवला. (sharad pawar reaction on pm narendra modi adani ambani sending money through tampo to congress rahul gandhi)
ADVERTISEMENT
शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पवारांना राष्ट्रवादी काँग्रेममध्ये विलीनकरणावर प्रश्न विचारला होता. यावर पवार म्हणाले, मी असं म्हणालो नाही. असं मी म्हणालो नाही. अशा शब्दात विलीनीकरणावर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2000 पासून एकत्र काम करत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत. मंत्री मंडळातही एकत्र होतो. मागच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले. आमची विचारधारा एकत्र आहे. एकत्रित काम करणे दोघांनाही पटल्यामुळे आम्ही काम करत आहोत, असे शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Pune Crime : WhatsApp आणि 900 अश्लील व्हिडिओ...,
पंतप्रधान मोदींनी अदाणी-अंबानीवरून काँग्रेसवर टीका केली होती.या टीकेवर शरद पवार म्हणाले, अदाणी-अंबानी हे आजपर्यंत कोणाचे दोस्त आहेत. याची देशात नेहमीच चर्चा होते. ज्यांच्याबद्दल चर्चा होते ते काँग्रेसवर ढकलत आहे.
हे वाचलं का?
राहुल गांधींचा पलटवार
पंतप्रधान मोदींच्या या टीकेला राहुल गांधींनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून उत्तर दिलं आहे. 'अंबानी-अदाणी टेम्पोतून पैसे देतात. हा काय तुमचा स्वत:चा अनुभव आहे का?' असा सवाल राहुल गांधींनी या निमित्त पंतप्रधान मोदींना विचारला.
'नमस्कार मोदीजी आपण घाबरलात का? सहसा तुम्ही बंद दाराआड तुम्ही अंबानी-अदाणींबाबत बोलता.. पहिल्यांदा तुम्ही जाहीररित्या अंबानी-अदाणी बोलले..' 'तुम्हाला हे देखील माहिती आहे की, ते टेम्पोतून पैसे देतात. हा काय तुमचा स्वत:चा अनुभव आहे का? एक काम करा.. सीबीआय-ईडीला यांच्याकडे पाठवा ना.. संपूर्ण चौकशी करा. लवकरात लवकर चौकशी करा.. अजिबात घाबरू नका मोदीजी.'
'मी देशाला पुन्हा एकदा सांगतोय जेवढा पैसा नरेंद्र मोदीजींनी यांना दिलाय ना तेवढाच पैसा आम्ही हिंदुस्थानातील गरीब लोकांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना, या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना लखपती बनवू आम्ही.. यांनी 22 जणांना अब्जाधीश बनवलं आहे. आम्ही मात्र, कोट्यवधी जणांना लखपती बनवू.' असं राहुल गांधी म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "एकनाथ शिंदे तुरुंगात जाणार", तडीपारीच्या कारवाईवरुन संजय राऊत भडकले
PM मोदींचा आरोप काय?
पाच उद्योगपती, पाच उद्योगपती.. मग हळूच म्हणू लागले. अंबानी-अदाणी... मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदाणींना शिव्या देणं बंद केलं.'
ADVERTISEMENT
पंतप्रधानांनी काँग्रेसला सवाल विचारताना म्हणाले की, 'राजकुमाराने घोषित करावे की, या निवडणुकीत अंबानी-अदाणी यांच्याकडून किती 'माल' उचलला आहे. काळा पैशाच्या किती पोती आणल्या आहेत? टेम्पो भरून नोटा काँग्रेससाठी पोहोचल्या आहेत का? काय डील झालं आहे? तुम्ही एका रात्रीत अंबानी-अदाणींना शिव्या देणे बंद केले. जरूर दाल मै कुछ काला है... पाच वर्षे तुम्ही अंबानी-अदाणींना शिव्या दिल्या. पण एका रात्रीत शिव्या देणं बंद झालं. म्हणजे कोणता ना कोणता चोरीला माल हा टेम्पो भरभरून तुम्हाला मिळाला आहे. याचं उत्तर तुम्हाला देशाला द्यावं लागेल.' अशी टीका मोदींनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT