Shiavajirao Adhalrao Patil : ''दादा माझा राजीनामा घ्या...'', आढळरावांनी कोल्हेंच्या वर्मावर ठेवलं बोट

mumbaitak.web aajtak

ADVERTISEMENT

shiavajirao adhalrao patil criticize amol kolhe on ajit pawar ncp join shirur lok sabha election 2024 maharashtra politics
अजित पवारांनी कार्यक्रमातून भाषण करतानाच शिवाजी आढळराव पाटलांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.
social share
google news

Shiavajirao Adhalrao Patil Criticize Amol Kolhe : स्मिता शिंदे, शिरूर : शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूरमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर अजित पवारांनी कार्यक्रमातून भाषण करतानाच शिवाजी आढळराव पाटलांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर या कार्यक्रमातून बोलताना आढळराव पाटलांनी (shiavajirao adhalrao patil) अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) जोरदार हल्ला चढवला होता. मतदार संघात काम तर काही केलं नाही पण संसदरत्न, संसदरत्न...टेऱ्या बनवुन प्रचार चाललाय, अशा शब्दात आढळरावांनी कोल्हेंवर टीका केली आहे.  (shiavajirao adhalrao patil criticize amol kolhe on ajit pawar ncp join shirur lok sabha election 2024 maharashtra politics) 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले की, बायपासेस या सगळ्या गोष्टी माझ्या काळात मंजुर झाल्या होत्या. पण नारळ फोडायला हे गृहस्थ आलं आणि सगळीकडे हे सांगत सुटलंय त्यांनी काम केलंय, अशी टीका आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केली.

हे ही वाचा : BJP List : भाजपचा 'या' खासदारांसोबत 'खेला'; पहा कुणा कुणाची कापली तिकीटे

मला दोन वेळा संसदरत्न मिळालाय, तिसऱ्यांदा मी घेतला नाही. बारणेंना 8 वेळा मिळालाय. पण पाच वर्षात याने काहीच काम केलं नाही आणि म्हणतो संसदरत्न... असा संसदरत्न संसदरत्न...टेऱ्या बनवुन प्रचार चाललाय. ससंदरत्नाचा सरकारशी संबंध नाही. चैन्नईतली एक खाजगी कंपनी आहे ती पुरस्कार वाटत बसते, अशा शब्दात आढळरावांनी कोल्हेंवर टीकास्त्र डागलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोल्हेंना जाहीर आव्हान 

माझ्या समोरच्या उमेदवाराला माझं जाहीर आव्हान आहे.  बैलगाडा, कांदा, शेतकऱ्यांचा प्रश्न असो...त्यांची भाषणाची संख्या आणि माझी भाषणाची संख्या पाहा. कांद्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मी मांडलेत. बैलगाडाच्या प्रश्नांवर त्यांच्यापेक्षा जास्त वेळ भाषणे मी केली आहेत. पण मला डायलॉगबाजी, फेकाफेकी करता येत नाही, असे म्हणत आढळरावांनी कोल्हेंची खिल्ली उडवली. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT : तीन जागा गमावल्या, ठाकरेंना आता 'हे' मतदारसंघ मिळणार!

मी कधी लबाडी  केली नाही.मी कधी खोटा प्रचार केला नाही. मी कधी दुसऱ्यांच्या कामांच श्रेय घेतलं नाही. दादा मी काम करत असताना कधी असंही म्हणालो नाही, पुढच्या काळात निवडून आल्यावर,  दादा माझा राजीनामा घ्या, मला वेळ नाही धंद्यामधून... कारण मी लोकांचे सेवेचे व्रत घेतले आहे, ते शेवटपर्यंत पुर्ण करेन, अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्हेंना डिवचलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT