Shiv Sena UBT Lok Sabha Candidates : सांगली ठाकरेंकडेच! 17 उमेदवारांची केली घोषणा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार?
uddhav Thackeray Shiv Sena Election symbol for Sabha 2024
social share
google news

Uddhav Thackeray Announced Shiv Sena Candidates for Lok Sabha Elections : अखेर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काही मतदारसंघावरून महाविकास आघाडीत पेच होता, तो मिटला आहे. पहिल्या यादीतून सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा (युबीटी) उमेदवार असणार हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर काँग्रेस ज्या जागांसाठी आग्रही होती, त्याही ठाकरेंना मिळाल्या आहेत. 

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 17 उमेदवारांचा समावेश असून, यात सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार असणार आहे.

अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लढणार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात १६ उमेदवारांच्या यादीबरोबरच अनिल देसाई यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. "हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य :अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे", अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिंदेंच्या 5 ते 6 खासदारांचा पत्ता होणार कट?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांची संपूर्ण यादी

बुलढाणा लोकसभा - नरेंद्र खेडेकर

यवतमाळ -वाशिम लोकसभा - संजय देशमुख

ADVERTISEMENT

मावळ लोकसभा - संजय वाघेरे-पाटील

ADVERTISEMENT

सांगली लोकसभा - चंद्रहार पाटील

हिंगोली लोकसभा - नागेश पाटील आष्टीकर

औरंगाबाद लोकसभा - चंद्रकांत खैरे

उस्मानाबाद लोकसभा - ओमराजे निंबाळकर

शिर्डी लोकसभा - भाऊसाहेब वाघचौरे

नाशिक लोकसभा - राजाभाऊ वाजे

रायगड लोकसभा - अनंत गीते

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा - विनायक राऊत

ठाणे लोकसभा - राजन विचारे

मुंबई ईशान्य लोकसभा - संजय दिना पाटील

मुंबई दक्षिण लोकसभा - अरविंद सावंत

मुंबई वायव्य लोकसभा - अमोल कीर्तिकर

परभणी लोकसभा - संजय जाधव

मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Candidates For lok Sabha elections 2024
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी.

 

सांगली, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य ठाकरेंकडे

महाविकास आघाडीत काही जागांचा पेच फसला होता. यात सांगली, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य  या मतदारसंघांचाही समावेश होता. मुंबई दक्षिण मध्य जागेवरून वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या, तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजय निरुपम हे इच्छुक होते. मात्र, दोन्ही मतदारसंघांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार घोषित केले आहेत. अमोल कीर्तिकर आणि संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

हेही वाचा >>  'मी स्वकर्तृत्वावर बनलो, माझा काका अभिनेता, डॉक्टर होता म्हणून...', कोल्हेंचा अजित पवारांवर जोरदार हल्ला

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने शिवसेनेकडून घेतला. त्याबदल्यात ठाकरेंनी सांगली मतदारसंघांची मागणी केली होती. याला काँग्रेसकडून विरोध होता. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे, त्यामुळे या जागेचा वादही निकाली निघाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT