Lok Sabha Elections 2024 : शिंदेंच्या 5 ते 6 खासदारांचा पत्ता होणार कट?

मुंबई तक

Shiv Sena Lok Sabha candidates update : उमदेवारी धोक्यात असलेल्या खासदारांपैकी एकाच नाव जवळपास निश्चित झाले. रामटेकमधून शिंदेंनी दुसरा उमेदवार शोधला आहे.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या काही खासदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
शिंदेंच्या शिवसेना खासदारांची तिकिटे कापली जाणार असल्याची चर्चा आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काही शिवसेना खासदारांची उमेदवारी धोक्यात

point

कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत गोडसेंना तिकीट मिळणार की नाही?

point

सर्व्हेमुळे खासदारांच्या अडचणी वाढल्या

Shiv Sena Lok Sabha Candidates : शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे आपल्या समर्थकांसह रविवारी (२४ मार्च) मुंबईत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. गोडसेंच्या या शक्तिप्रदर्शनाने जी शंका गेल्या काही दिवसांपासून बोलून दाखवली जात होती, ती खरी ठरताना दिसत आहे. गोडसे यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे बोलले जात असून, गोडसेंबरोबर शिवसेनेच्या 5 ते 6 खासदारांना डच्चू दिला जाणार, असे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व्हे करण्यात आले होते. यात शिवसेनेच्या पाच ते सहा खासदारांच्या मतदारसंघातील सर्व्हे चांगला नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >> 'बारामतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघूनच घेतो..' अजितदादांचा सख्ख्या भावाला थेट इशारा? 

शिंदेंच्या शिवसेनेच्या ५ ते ६ खासदारांविरोधात मतदारसंघात वातावरण असून, त्यांना बदलण्याची सूचनाही भाजपकडून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यादृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत. 

राजकीय वर्तुळात ज्या खासदारांच्या नावांची चर्चा आहे, त्यात खालील नावांचा समावेश आहे. 

हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा मतदारसंघ
भावना गवळी, यवतमाळ-वाशिम लोकसभा
हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा
कृपाल तुमाने, रामटेक लोकसभा
गजानन कीर्तिकर, मुंबई उत्तर पश्चिम
संजय मंडलिक, कोल्हापूर

हे वाचलं का?

    follow whatsapp