Amol kolhe : 'मी स्वकर्तृत्वावर बनलो, माझा काका अभिनेता, डॉक्टर होता म्हणून...', कोल्हेंचा अजित पवारांवर जोरदार हल्ला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

amol kolhe criticize ajit pawar on shiavajirao adhalrao patil join ncp shirur lok sabha constituncy maharashtra politics
आम्ही शेतकऱ्याची पोर असतो. आमचा काका राजकारणात नसतो.
social share
google news

Amol Kolhe criticize Ajit Pawar : मी जे काही आज आहे ते स्वकर्तृत्वावर आहे. माझा काका मोठा अभिनेता होता म्हणून मी अभिनेता झालो नाही, माझा काका ड़ॉक्टर होता म्हणून मी एमबीबीएस झालो नाही. मी स्वताच्या कष्टाने अभिनेता, डॉक्टर झालो, असे विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol kolhe) करत उप मुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार निशाणा साधला आहे.  (amol kolhe criticize ajit pawar on shiavajirao adhalrao patil join ncp shirur lok sabha constituncy maharashtra politics) 

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्या उपस्थितीत शिरूरमध्ये एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून त्यांना शिरूरूमधून उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर आढळराव पाटील यांनी आणि अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. या टीकेला आता अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : राऊतांनी CM शिंदेंना डिवचलं, ''गुलामांच्या तोंडावर तुकडे...''

''आम्ही सॉफ्ट टार्गेट असतो. कारण आम्ही शेतकऱ्याची पोर असतो. आमचा काका राजकारणात नसतो. आम्हाला सोन्याचा चमचा देऊन कुणी राजकारणात आणलेलं नसतं. आणि मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वावर केलं. माझा काका फार मोठा अभिनेता आहे, म्हणून त्याने मला बोटाला धरून आणलं, मी स्वताच्या कष्टाने अभिनेता झालो. माझा काका कुणी ड़ॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएसची सीट मिळाली नाही दिली. मी ती स्व:कष्टाने मिळवली आणि डॉक्टर झालो, असे म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं. 

हे वाचलं का?

तसेच माझा राजकारणाचा पिंड नाही. माझं भ्रष्टाचारात नाव आलं नाही, मग माझा राजकारणाचा पिंड नाही का? आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या पोरांचा काका राजकारणात नाही,मग  त्यांनी राजकारणात येण्याची स्वप्नच बघायची नाहीत का? तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण? आमचा राजकारणाचा पिंड नाही? असा आक्रमक सवाल देखील अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना विचारला होता. 

हे ही वाचा : Shiavajirao Adhalrao Patil : ''दादा माझा राजीनामा घ्या...'',

दरम्यान कोल्हेंनी एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा. मग बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का?, असा सवाल अजित पवारांनी केला होता. यावर बोलताना कोल्हे म्हणाले, जे आज दादांनी विधान केलं ते दादा महायुतीच्या स्टेजवरून करतील का? माझ्यावर दादांनी जी टीका केली ती पंतप्रधान मोदी आणि शाहांसमोर करावी. मग ती भूमिका मांडावी, असे प्रत्युत्तर कोल्हेंनी अजित पवारांना दिले आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT