Shiv Sena UBT : तीन जागा गमावल्या, ठाकरेंना आता 'हे' मतदारसंघ मिळणार!

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये किती जागा मिळणार?
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोणते मतदारसंघ मिळणार?
social share
google news

Uddhav Thackeray Shiv Sena UBT Lok Sabha Seats : महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत उद्धव ठाकरेंना शिवसेनेकडे असलेले तीन मतदारसंघ गमवावे लागले. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला कोणते मतदारसंघ मिळणार याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत. तर जाणून घेऊयात ठाकरेंच्या शिवसेनेला मिळू शकणारे संभाव्य मतदारसंघ आणि उमेदवार... (Shiv Sena UBT lok Sabha Seats And Candidates)

महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या यादीमध्ये 15 ते 16 उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहे. कोणते मतदारसंघ शिवसेनेकडे राहू शकतात आणि कुठल्या मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही, हे बघा...

शिवसेना ठाकरे गटाला मिळणाऱ्या संभाव्य जागा आणि उमेदवार 

1) जळगाव - स्पष्ट नाही
2) बुलढाणा - नरेंद्र खेडेकर 
3) यवतमाळ वाशीम - संजय देशमुख
4) हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर  
5) परभणी - संजय जाधव 
6) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे  
7) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर  
8) शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे  
9) नाशिक - विजय करंजकर  (यासंर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा करून शेवटला निर्णय होऊ शकतो)
10) ठाणे - राजन विचारे 
11) कल्याण -स्पष्ट नाही

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मविआ 'वंचित'ला देणार 'इतक्या' जागा; चेंडू ठाकरे-पवारांच्या कोर्टात

12) पालघर - स्पष्ट नाही
13) मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील  
14) मुंबई दक्षिण - अरविंद सावंत
15) मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई  (काँग्रेसमधून वर्ष गायकवाड आग्रही)
16) मुंबई उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर (काँग्रेसचे संजय निरुपम आग्रही)
17) उत्तर मुंबई - निर्णय नाही
18) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत 
19) रायगड - अनंत गीते
20) सांगली - चंद्रहार पाटील (काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहेत)
21) हातकणंगले - राजू शेट्टी (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )
22) मावळ - संजोग वाघेरे

तीन जागा गमावल्या, आणखी दोन जागा सोडाव्या लागणार!

महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन जागा काँग्रेसला सोडाव्या लागल्या. कोल्हापूर, रामटेक, अमरावती हे मतदारसंघ शिवसेनेचे राहिलेले आहेत. मात्र, यावेळी ठाकरेंना तडजोडी करताना काँग्रेसला सोडावे लागले. त्यात आता वंचित बहुजन आघाडीला सहा जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने समोर ठेवला आहे. यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ठाकरेंना आणखी दोन मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला द्यावे लागू शकतात. यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही दोन जागा कमी मिळतील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT