Survey: CM शिंदेंसाठी बॅड न्यूज, शिंदेंच्या कामकाजावर किती लोकं समाधानी? सर्व्हेतून मोठा खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्र्यांच्या कामावर किती टक्के लोकं समाधानी
पाहा मुख्यमंत्र्यांच्या कामावर किती टक्के लोकं समाधानी
social share
google news

Maharashtra CM Eknath Shinde: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये महाराष्ट्रात 48 मतदारसंघांसाठी 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दरम्यान, सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. पण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चिंतेत भर टाकणारा एक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण एबीपी सी-व्होटरने केले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांच्या कामावर किती समाधानी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (survey how satisfied are people with work of maharashtra cm eknath shinde in maharashtra a big revelation in survey)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात? या प्रश्नावर उत्तर देताना 32 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर बरंच समाधानी असल्याचे मान्य केले. तर 26 टक्के कमी समाधानी तर 36 टक्के असमाधानी आणि उरलेले 6 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काहीच मत व्यक्त केलं नाही. 

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर तुम्ही किती समाधानी?

एबीपी न्यूजसाठी, सी-व्होटरने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीचे सर्वेक्षणही केले. या सर्वेक्षणात लोकांना प्रश्न विचारण्यात आला की, 'राज्य सरकारच्या कारभारावर ते किती समाधानी आहेत? या प्रश्नावर जनतेचे मत जाणून घेण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर 22 टक्के लोक समाधानी आहेत. तर 34 टक्के कमी आणि 37 टक्के असमाधानी आहेत. उर्वरित 7 टक्के लोक म्हणतात की त्यांना माहीत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'छत्रपतींच्या गादीचा सन्मान महायुतीने ठेवलाच नाही..', पवारांच्या शिलेदाराचा भाजपवर वार!

महाराष्ट्राच्या निवडणुकीतील भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजप हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखला जातो. शिवसेना हा मराठी प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. सध्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व आहे.

शिवसेनेचे दोन गट होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व केले होते. शिवसेनेचा एक गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT), जो 21 जागांवर निवडणूक लढवत आहे.

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला टक्कर देताना दिसणार आहे. यापूर्वी अजित पवार महाविकास आघाडीचा (MVA) भाग होते, ज्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> पवारांचं 'ते' वाक्य, सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात टचकन..

एबीपी न्यूजसाठी, सी व्होटरने बिहार आणि महाराष्ट्रातील लोकांची मतं जाणून घेतली आहे. 1 ते 9 एप्रिल दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 2 हजार 600 लोकांची मतं विचारण्यात आली. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT