Udhhav Thackeray : '...तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन', ठाकरेंचं मोठं विधान

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray big statement pm narendra modi if anything happens with modi i too will run  lok sabha election 2024
मोदी जितकं गाईबद्दल बोलतात तितकं महागाई बद्दल का बोलत नाही.
social share
google news

Uddhav Thackeray On Pm Narendra Modi : 'उद्धव ठाकरे माझे शुत्र नाहीत. उद्या संकटात असल्यास त्यांच्या मदतीला धावून जाईन'  असे मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी एका मुलाखतीत केलं होते. मोदींच्या या विधानावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदींनाही काही झालं तर मी सुद्धा धावून जाईन, हेच तर आमचे हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरेंच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  (uddhav thackeray big statement pm narendra modi if anything happens with modi i too will run  lok sabha election 2024) 

टीव्ही 9 मराठी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे  यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंच्या रँलीत पाकिस्तानचा झेंडा फडकतो? असा सवाल ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर ठाकरे म्हणाले, मला देंवेंद्र फडणवीसांकडून नवाब शरीफांचा पत्ता घ्यायचा आहे. कारण त्यांचे मोदीजी नवाब शरीफांच्या वाढदिवसाचा केक न बोलता खायला गेले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या झेंडा यांच्या मनात फडकतोय, असा पलटवार ठाकरेंनी केला आहे. 

हे ही वाचा : 'मोदी देशाचे प्रमुख आहेत पण...', पवारांनी वर्मावरच ठेवलं बोट

ठाकरेंचं मोदींना आव्हान 

मोदी जितकं गाईबद्दल बोलतात तितकं महागाई बद्दल का बोलत नाही. मणिपूरमध्ये मोदी का जात नाहीत. मोदींचं इतकं शौर्य आहे तर मणिपूरमध्ये त्यांची शेपटी का हलते? चीन ढेंगेत घुसतोय, त्याबद्दल मोदी का बोलत नाही, अशा प्रश्नांची सरबत्तीही ठाकरेंनी मोदींवर केली. तसेच भाजपने 10 वर्षात केलेली 10 कामे सांगावी, असे आव्हान देखील ठाकरेंनी मोदींना दिले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठीण काळात ठाकरेंच्या मदतीला धावून येण्याची भाषा केली होती. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, ''मोदींनाही काही झालं तर मीही धावून जाईन, त्यात काय ही माणूसकी आहे. हेच तर आमचे हिंदुत्व आहे. ज्यावेळी एखादी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस आम्ही विचार करत बसत नाही, तू हिंदू आहे का मुस्लिम आहेस, तो स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्याला वाचवतो. हे आमचं हिंदुत्व आहे.यालाच माणूसकी म्हणातात, असे ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. 

हे ही वाचा : Sharad Pawar : "लाचारी करावी, पण...", पवारांनी पटेलांचे टोचले कान

'तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. त्याच्या मुलाला तुम्ही सेटल करताय. घराणीच्या घराणी फोडून तुम्ही तुमच्याकडे घेतली. मला जो अडीच वर्षाचा शब्द दिला होता, तो जर तुम्ही पाळला असतात, तर तुम्हाला ही चोरी चपाटी करायची वेळ नसती आली. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून टाकतील', अशी टीका देखील ठाकरेंनी मोदींवर केली. 

ADVERTISEMENT

'तुम्ही मला माझ्या मुलावरून बोलत असाल, तर ठिक आहे पण तुम्ही स्वता: किती वेळा बोहल्यावर चढणार आहात. स्वत: मुंडावळ्या बांधुन तयार आणि बाकीचे त्यांचे जे ते उतावळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार, स्वता चढता बोहल्यावर आणि दुसऱ्याच्या घराणेशाही काय बोलता', असा टोला देखील ठाकरेंनी मोदींना लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT