Satar Lok Sabha : आंबेडकरांनी उदयनराजेंविरोधात उतरवला 'वंचित'चा उमेदवार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत कदम यांना उमेदवारी.
वंचित बहुजन आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक

point

वंचित बहुजन आघाडीने प्रशांत कदम यांना दिली उमेदवारी

point

शिर्डीमधून उत्कर्षा रुपवते यांना तिकीट

Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Candidate list : भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मैदानात उतरवला आहे. वंचितकडून शिर्डी आणि सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Prashant Kadam is Vanchit Bahujan Aghadi Candidate from Satara Lok Sabha)

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने सातारा लोकसभा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले. साताऱ्यातून प्रशांत रघुनाथ कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सैनिक आहेत. तर शिर्डीमधून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

हे वाचलं का?

उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे, वंचितची ताकद किती?

सातारा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा >> नागपूर ते गडचिरोली... 2019 मध्ये पाच मतदारसंघात काय होती स्थिती? 

उदयनराजे भोसले हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंची 'एवढी' संपत्ती, सदानंद सुळेंकडे तर... 

पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना ६ लाख ३६ हजार ६२० मते मिळाली होती. तर उदयनराजे भोसले यांना ५ लाख ४८ हजार ९०३ मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खंडाईत यांना १७ हजार २०३ मते मिळाली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ४० हजार मते घेतली होती. त्यामुळे यावेळी वंचित किती मते घेणार आणि त्याचा फटका कुणाला बसणार, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

 

काँग्रेसमधून आलेल्या उत्कर्षा रुपवतेंना उमेदवारी

वंचितने शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT