Vijay Shivtare: 7 तास थांबवलं... CM शिंदेंच्या भेटीनंतर विजय शिवतारे थेट म्हणाले, 'मी चार दिवस सांगतोय..'
Vijay Shivtare and CM Shinde शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना CM शिंदेंना भेटण्यासाठी तब्बल 7 तास वाट पाहावी लागली. वाचा त्यानंतर झालेल्या भेटीत शिंदे आणि शिवतारेंमध्ये नेमकं काय ठरलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिवतारेंना 7 तास पाहावी लागली वाट
शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
शिंदेंच्या भेटीनंतर शिवतारे नेमकं काय म्हणाले?
Vijay Shivtare Vs Ajit Pawar: मुंबई: 'तू कसा निवडून येतो ते पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे.' उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत असं विधान करून महायुतीमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांना तब्बल 7 तासांच्या प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भेट मिळाली. ज्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक मोठं विधान केलं. (vijay shivtare vs ajit pawar baramati made to wait for 7 hours after meeting cm shinde shivtare directly said i have been saying for four days mentality has not changed)
ADVERTISEMENT
'माझी मानसिकता काय हे जे मी चार दिवस सांगतोय.. तशीच आहे.. परंतु आमची बाजू आम्ही समजून सांगितली आहे. त्यांनीही ऐकून घेतलं आहे.' असं म्हणत शिवतारे यांनी आपण अद्यापही मागे हटणार नाही. काहीही झालं तरी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार याचेच संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी तब्बल 7 तास शिवतारे पाहायला लावली वाट...
शिवतारेंच्या विधानामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला. त्यामुळेच या सगळ्याबाबत नेमकी स्पष्टता यावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी शिवतारे हे आज (14 मार्च) मुंबईत आले होते. मात्र, इथे त्यांना 7 तास वाट पाहावी लागली.
हे वाचलं का?
दुपारी बारा वाजल्यापासून वेटिंगवर असलेल्या शिवतारे यांची रात्री 8 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. 'मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मला संयम ठेवावा लागेल.' असंही शिवतारे दुपारी म्हणाले होते.
हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : 'या' तीन तालुक्यातील राजकारण अजित पवारांचं गणित बिघडवणार?
मुख्यमंत्री पाच वाजेच्या सुमारास 'वर्षा'वर आले. पण नंतर ते नंदनवनवर निघून गेले होते. तर दुसरीकडे हेलिकॉप्टरने आलेल्या शिवतारेंना मात्र, वर्षावर सात तास वाट पाहायला लागली होती. या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नंदनवनवर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारेंना भेटायला बोलावलं त्यानंतर त्या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली.
ADVERTISEMENT
'चार दिवसांपासून माझी मानसिकता सारखीच आहे...'
'मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. माझं मत काय.. सर्व कार्यकर्ते, जिल्हा परिषद, तालुक पंचायत सदस्य, नगरसेवक मोठे पदाधिकारी असे सगळे आले आहेत. जवळजवळ 150 प्रमुख पदाधिकारी आले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं... की, हा त्रास आमच्याकडे आहे. माझी भावना काय ती त्यांना कळवली.'
ADVERTISEMENT
'भाईंनी ते ऐकून घेतलं.. सगळे कार्यकर्ते देखील बोलले.. याबाबतीत त्याविषयी चर्चा करून दोन दिवसांनी पुन्हा एक बैठक होईल. त्यानंतर निर्णय होईल. दोन दिवस शांत राहणे.. परंतु दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांसोबत निवडक चार-पाच जणांसह चर्चा होईल.'
'कदाचित मुख्यमंत्र्यांना कोणाशी काही चर्चा करायची असेल.. पण दोन दिवसानंतर याबाबत निर्णय होईल.'
'मी तुम्हाला काय सांगितलं की, माझी मानसिकता काय हे जे मी चार दिवस सांगतोय.. तशीच आहे.. परंतु आमची बाजू आम्ही समजून सांगितली आहे. त्यांनीही ऐकून घेतलं आहे. त्याबाबतीत दोन दिवसानंतर मोजक्या पदाधिकाऱ्यासह ते आम्हाल निर्देश देतील.'
'आता तुम्हाला एवढंच सांगतो.. अरे आता कुठे फॉर्म भरलेत का कोणी.. अजून वेळ आहे..' असं शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हणाले.
अजित पवारांवर शिवतारेंनी काय केलेली टीका?
11 मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे म्हणालेले की, 'बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा काही कुणाचा सातबारा नाही. की, सतत 50 वर्ष बारामतीचं खासदार राहायचं. पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे.. का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं? काय मिळालंय आम्हाला?'
'तुम्हाला आम्हाला विचार करून चालावं लागेल. याच पालखीतळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी... अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा. तू कसा निवडून येतो ते पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे.' असं थेट आव्हान शिवतारेंनी दिलं होतं.
हे ही वाचा>> Amol Mitkari : महायुतीत वादाची ठिणगी! मिटकरी CM शिंदेंच्या नेत्यावर भडकले
त्यानंतर पुन्हा एकदा 13 मार्चला शिवतारेंनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. 'अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठलीय, महायुतीत आल्यावर मी त्यांचा सत्कार देखील केला होता, पण त्यांची गुर्मी तशीच होती, आता माघार नाही, मी बारामती लढणार..'अशी भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती.
'तू कसा निवडून येतो हेच मी बघतो.. महाराष्ट्रात मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाच ऐकत नाही.. मी पाडतो म्हणजे पाडतो... गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात.' असं विधान शिवतारेंनी त्यावेळी केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT