Raj Thackeray: अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी स्वत: सांगितलं!

मुंबई तक

Raj Thackeray-Amit Shah: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांची राजधानी दिल्लीत जी भेट घेतली त्याबाबत आजच्या जाहीर भाषणात बरंच काही सांगितलं जाणून घ्या

ADVERTISEMENT

अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?
अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?
social share
google news

Raj Thackeray-Amit Shah Meeting: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज (9 एप्रिल) मुंबईत पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. मात्र, याच बरोबर त्यांची काही दिवसांपूर्वी अमित शाहांसोबत जी भेट झाली त्यात नेमकं काय घडलं हे राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. (what exactly happened in amit shah  meeting raj thackeray himself told in padva melava lok sabha election 2024)

राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीचा नेमका किस्सा जसाच्या तसा... 

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही. 

काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... "अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही." 

तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp