'गाव तिथे बिअरबार', अशी अजब आश्वासनं देणाऱ्या चंद्रपुरातील उमेदवार वनिता राऊत कोण?
चंद्रपूरमधील चिमूर गावात राहणाऱ्या वनिता राऊत या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या तिकिटावर त्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह पेनचे 'निप' असणार आहे. आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आश्चर्यकारक आश्वासने दिली.
ADVERTISEMENT
Lok sabha Election 2024 : विकास राजूरकर, चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केली. अशावेळी एका महिला लोकसभा उमेदवारने त्यांच्या भागात स्वस्त दरात दारू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी त्यांनी रेशनिंग प्रणाली वापरण्याबाबत सांगितले आहे. तसंच, दारू पिणाऱ्यांच्या आणि विक्री करणाऱ्यांच्या परवान्याबाबतही वक्तव्य केलं आहे. त्या निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. कारण, याआधीही त्यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. (Who is Vanita Raut the candidate from Chandrapurapur Who gave Assurance about beer bar in Villages and there low prices )
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमधील चिमूर गावात राहणाऱ्या वनिता राऊत या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या तिकिटावर त्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह पेनचे 'निप' असणार आहे. आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आश्चर्यकारक आश्वासने दिली. निवडणूक जिंकल्यानंतर त्या आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात बीअर बार उघडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याशिवाय खासदार निधीच्या मदतीने त्या आपल्या मतदारांना स्वस्तात व्हिस्की आणि बिअरही पुरवणार आहेत.
वनिता राऊत म्हणाल्या की, 'जिथे गाव आहे, तिथे बिअर बार आहे. हेच माझे मुद्दे आहेत.' दारू आयात करण्यासाठी रेशनिंग प्रणालीच्या वापरावर त्या म्हणतात की, 'दारू पिणाऱ्यांसह विकणाऱ्यांकडेही परवाना असणे आवश्यक आहे.'
हे वाचलं का?
वनिता राऊत यांनी दारूला का दिलं एवढं महत्त्व?
दारू स्वस्त करण्याच्या प्रश्नावर वनिता राऊत म्हणाल्या, 'गरीब लोक खूप कष्ट करतात. दारू पिऊन त्यांना शांती मिळते. मात्र त्यांना चांगल्या दर्जाची व्हिस्की आणि बिअर खरेदी करता येत नाही. अशा वेळी ते फक्त देशी दारू पितात. याच्या प्रमाणासाठी कोणतीही मर्यादा नाही आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते लोक बेशुद्ध होतात. त्यांनी आयात केलेल्या चांगल्या दारूचा आस्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे.'
'लोकांना जास्त दारू पिण्याचे परवाने दिले पाहिजेत. फक्त त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच हा परवाना देण्यात यावा.' असं वनिता राऊत म्हणाल्या.
ADVERTISEMENT
वनिता यांनी यापूर्वी 2019 मध्ये नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्याचवर्षी चिमूर विधानसभा निवडणूक लढवली. ज्यामध्ये त्यांची जामीन जप्त करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT