Lok Sabha 2024 : नामांतर होऊनही निवडणूक आयोग औरंगाबाद आणि उस्मानाबाद नाव का वापरतोय?

मुंबई तक

Aurangabad lok sabha Osmanabad Lok Sabha : मराठवाड्यातील दोन शहरांच्या नावांचे नामांतर करण्यात आले, मात्र लोकसभा मतदारसंघाला जुनेच नाव कायम राहणार आहे.

ADVERTISEMENT

औरंगाबाद आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे नाव कधी बदलणार?
निवडणूक आयोगाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे नाव का बदलले नाही?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे नाव कायम राहणार

point

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असाच उल्लेख करावा लागणार

point

केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Aurangabad lok Sabha, osmanabad lok sabha Rename news : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शहरांचा उल्लेख औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असा करण्यात आला. आयोगाकडून मतदारसंघांचे नामांतर का करण्यात आले नाही, हेच समजून घेऊयात...

महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर केले. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिल्यानंतर दोन्ही जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर झाले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ असा न करता औरंगाबाद आणि उस्मानाबाद असा उल्लेख केलेला आहे. 

निवडणूक आयोग जुनेच नाव का वापरतोय?

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर होऊनही जुनीच नावे आयोगाकडून वापरली जात आहे. याबद्दल आयोगाकडून खुलासा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही नावे कधी वापरली जाणार, याबद्दलही आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा >> "तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती", भाजप-सेनेचे सोशलवर 'युद्ध' 

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत दोन्ही मतदारसंघांचे नाव कायम राहणार आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना या लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना औरंगाबाद लोकसभा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असाच उल्लेख करावा लागणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp