BJP vs Shiv Sena : "तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती", भाजप-सेनेचे सोशलवर 'युद्ध'
BJP vs Shivsena : भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
Ambadas Danve vs Chandrashekhar Bawankule, BJP vs Shivsena : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईत होणार आहे. यानिमित्त इंडिया आघाडीतील अनेक नेते एकाच व्यासपीठावर येणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) देखील यावेळी हजर असणार आहेत. तत्पुर्वी भाजपकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ शेअर करत ठाकरेंना डिवलचं आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ठाकरे विरूद्ध भाजप असा संघर्ष पेटलाय. (udhhav thackeray shiv sena ambadas danve reply chandrashekhar bawankule bjp vs shiv sena rahul gadhi bharat jodo nyay yatra shivaji park)
ADVERTISEMENT
भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केला आहे. तर आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? असा सवाल बावनकुळेंनी विचारत ठाकरेंना डिवचलं होतं.
हे ही वाचा : अकलूजच्या 'शिवरत्नवर' खलबतं! मोहिते पाटील काय डाव टाकणार?
अंबादास दानवेंचे ट्विट जसंच्या तसं
''2014 साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा.''
हे वाचलं का?
''याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण 2014 साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांना लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर ज्या भाषेत तुमच्यावर प्रहार झाला असता, तो तुम्हाला सहन झाला नसता. उगाच त्यांचे दाखले कशाला देता.''
''त्यांनी हयातभर भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. ही देखील त्यांचीच शिकवण आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खोटा पुळका आहे तुम्हाला, जर हे प्रेम खरे असते तर एव्हाना तुम्ही त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असता''
ADVERTISEMENT
हे ही वाचा : युट्यूबर एल्विश यादव अडकला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चंद्रशेखर बावनकुळेंचं संपूर्ण ट्विट
शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. तत्पूर्वी या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला.याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.
ADVERTISEMENT
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही आहे, ज्यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, पण माझे दुकान बंद करू.’राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाही. ते का करत नाही, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे.
आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT