Nagpur Lok Sabha Election 2024 : गडकरींना देणार 'फाईट'; कोण आहेत विकास ठाकरे?
Who is Vikas Thakre, Congress Candidate from nagpur lok sabha : विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

ADVERTISEMENT
Vikas Thakre vs Nitin Gadkari Lok Sabha Elections 2024 : नागपूर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विकास ठाकरे नेमके कोण आहेत, हेच जाणून घ्या... (Who is Vikas Thakre?)
नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याबद्दलची उत्सुकता संपली आहे. नितीन गडकरी यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंचे नाव काँग्रेसने जाहीर केले.
कोण आहेत विकास ठाकरे?
विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसचे शहराध्यक्षही आहेत. २००२ मध्ये नगरसेवक, महापौर आणि नंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
हेही वाचा >> 'अजित पवार विंचू'; शिवतारेंनी फुंकलं रणशिंग; पुढचा प्लॅन काय?
२०१९ मध्ये विकास ठाकरे यांना पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आणि ते विजय झाले. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते विलासराव मुत्तेमवार यांचे समर्थक असलेल्या विलास ठाकूर यांची धाडशी आणि धडाकेबाज नेता अशी ओळख आहे.