Ravindra Waikar : ठाकरेंना बसणार मोठा झटका, वायकर कोणत्याही क्षणी शिंदेंच्या शिवसेनेत!
Ravindra Waikar Latest News : आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रवींद्र वायकर यांचे शिंदेंच्या सेनेत जाणे जवळपास निश्चित

उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणार धक्का

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश
Ravindra Waikar Shiv sena : उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असलेले आमदार रवींद्र वायकर कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाणार असल्याची सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकरांनी साथ सोडल्यास ठाकरेंना हा लोकसभा निवडणुकीच्या हा मोठा धक्का असणार आहे. (Ravindra Waikar most likely to join CM Shinde camp)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र वायकर हे आज (१० मार्च) रात्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे उद्धव ठाकरे पक्षबांधणी करत असताना आणखी एक धक्का बसणार आहे.
भूखंड घोटाळा प्रकरणामुळे लांबला प्रवेश?
रवींद्र वायकर यांच्यावर मुंबईतील जोगेश्वरी येथील आरक्षित भूखंडावर नियमबाह्य हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. २०२२ मध्ये सोमय्यांनी हा आरोप केल्यापासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे.
याचदरम्यान वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाल्याचे म्हटले गेले होते. पण, या प्रकरणामुळे पक्षप्रवेश लांबल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.