कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेता अजय देवगणचा पुढाकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. राज्यातंही कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. त्याचप्रमाणे राज्यात ऑक्सिजन, बेड्स तसंच रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. या काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय. अशातच अजय देवगणने देखील लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

अजयने मुंबई महानगरपालिका तब्बल 1 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुंबई महापालिका आणि हिंदुजा रुग्णालयाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आयसीयू युनिटच्या उभारणीत अजयने त्याचं योगदान दिलंय. त्याचसोबत त्याने आपल्या मित्रांसोबत 20 आयसीयू बेड्सची व्यवस्थाही केलीये. अजय देवगणच्या संस्थेच्या माध्यमातून ही रक्कम बीएमसीला देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यावेळी अजय देवगणने धारावीसाठी व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान अजय पाठोपाठ आता अक्षयकुमार तसंच ट्विंकल खन्नाने मदतीचा हात पुढे केलाय. मुंबईत अक्षयकुमार आणि ट्विंकल मिळून 120 ऑक्सिजन सिलेंडर्सची मदत केलीये. ट्विंकलने याबाबत सोशल मीडियाावरूनही माहिती दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT