आधुनिक महिलांना आळशी म्हणणारी सोनाली कुलकर्णी झाली ट्रोल, आता म्हणाली..

मुंबई तक

Sonali Kulkarni on Women Statement: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका कार्यक्रमात सोनालीने आधुनिक भारतीय महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर तिला ट्विटरवर (Twitter) रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता सोनालीने तिने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा उद्देश नव्हता असं म्हणत तिने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sonali Kulkarni on Women Statement: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका कार्यक्रमात सोनालीने आधुनिक भारतीय महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर तिला ट्विटरवर (Twitter) रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता सोनालीने तिने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा उद्देश नव्हता असं म्हणत तिने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (actress sonali kulkarni became a troll for calling modern women lazy had to apologize)

सोनालीने मागितली माफी

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक पत्रक जारी करून तिचे म्हणणे शेअर केले आहे. यामध्ये तिने लिहिले की, ‘मी देखील एक महिला आहे, माझा उद्देश इतर महिलांना दुखावण्याचा नव्हता. स्त्रीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याबद्दल मी अनेकदा उघडपणे बोलले आहे. तसेच, मी आपल्या सर्वांच्या बाजूने बोलले आहे. तुम्ही लोकांनी माझ्या मुद्द्यावर टीका केली याचा मला आनंद आहे. मी केवळ महिलांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्याशी नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करत आहे.’

तिने पुढे लिहिले की, ‘याबाबत तेव्हाच मदत मिळेल, जेव्हा आम्ही स्त्रिया आपल्या नाजूकपणाने आणि बुद्धिमत्तेने स्वतःच्या पायावर उभे राहू शकू . जर आपण सहानुभूतीशील आणि सर्वसमावेशक लोक बनलो तर आपण एक निरोगी आणि आनंदी जागा तयार करू शकू. यासोबत मी सांगू इच्छितो की, जर माझ्या बोलण्याने तुमचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागते. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp