चंद्रमुखी सिनेमा हिट ठरल्यावर अमृता खानविलकरने दर्शन घेतलं तुळजाभवानी देवीचं. भावूक होत म्हणाली…

चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.
चंद्रमुखी सिनेमा हिट ठरल्यावर अमृता खानविलकरने दर्शन घेतलं तुळजाभवानी देवीचं. भावूक होत म्हणाली…
Ajay Shriram Parchure

मराठी सिनेसृष्टीत अमृता खानविलकरचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता खानविलकर ही चंद्रमुखी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चंद्रमुखी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.

अमृता खानविलकर ही गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तिने चंद्रा या नृत्यांगणेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता अमृताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अमृताने देवदर्शनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती देवदर्शन करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने भावूक कॅप्शन दिले आहे.

Ajay Shriram Parchure

“लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे …. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी release झाला ….. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं …. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही”, असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे.‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरला आहे. जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरल्याचे पाहायला मिळाले होते.

Ajay Shriram Parchure

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in