अमिताभ बच्चन यांनी 31 व्या मजल्यावर घेतला 4 BHK; किंमत ऐकून थक्क व्हाल

मुंबई तक

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा जलवा आजपण कायम आहे. वयाची 80 गाठली तरी त्यांची काम करण्याची पद्धत तरुणांप्रमाणे आहे. आज देखील अनेक चित्रपट ते करत आहेत. त्यांनी काहीही केलं तर त्याची चर्चा होते. नुकतंच त्यांनी एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे. जी मुंबईच्या पॉश भागात आहे. हे घर जितकं आलिशान आहे त्याची किंमत देखील तितकीच तगडी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा जलवा आजपण कायम आहे. वयाची 80 गाठली तरी त्यांची काम करण्याची पद्धत तरुणांप्रमाणे आहे. आज देखील अनेक चित्रपट ते करत आहेत. त्यांनी काहीही केलं तर त्याची चर्चा होते. नुकतंच त्यांनी एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे. जी मुंबईच्या पॉश भागात आहे. हे घर जितकं आलिशान आहे त्याची किंमत देखील तितकीच तगडी आहे. बच्चन यांनी पूर्ण फ्लोर विकत घेतलं आहे, जो जवळपास 12 हजार स्क्वेर फूट आहे.

प्रत्येक अपार्टमेंटची किंमत इतक्या कोटीची

रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगला परिसरात पार्थेनॉन बिल्डिंगच्या 31व्या मजल्यावर एक आलिशान घर खरेदी केले आहे. हे घर 12 हजार चौरस फुटांचे आहे. अमिताभ यांनी संपूर्ण मजला विकत घेतला आहे. या प्रकल्पात एका मजल्यावर फक्त दोन 4.5 bhk अपार्टमेंट आहेत. त्या बनवताना वास्तूची काळजी घेण्यात आली आहे. कार्पेट एरिया 3378 चौरस फूट आहे. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत 14.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनेक बंगले अमिताभ यांच्या नावावर आहेत

हे वाचलं का?

    follow whatsapp