जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगनाला कोर्टाकडून नोटीस

मुंबई तक

अभिनेत्री कंगना राणौत हिच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. कंगनाला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनावर अब्रु नुकसानीचा दावा केला होता. याचप्रकरणी कंगणाला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कंगनाने मुलाखतीदरम्यान बदनामी केल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. जुहू पोलिसांनी कोर्टाला सांगितलं की, जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात कथित बदनामीची तक्रार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री कंगना राणौत हिच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. कंगनाला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनावर अब्रु नुकसानीचा दावा केला होता. याचप्रकरणी कंगणाला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कंगनाने मुलाखतीदरम्यान बदनामी केल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

जुहू पोलिसांनी कोर्टाला सांगितलं की, जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात कथित बदनामीची तक्रार दाखल केल्यानंतर त्यासंदर्भात अजून चौकशीची गरज आहे. आणि त्यासंदर्भात आमचा तपास सुरु आहे. दरम्यान कोर्टाने यासंदर्भातील पुढील सुनावणीसाठी मार्चमध्ये तारिख दिली आहे.

सोमवारी कोर्टाला दिलेल्या रिपोर्टमध्ये जावेद अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज म्हणाले की, पोलिसांनी गेल्या महिन्यात कंगनाला समन्स पाठवले होते, ज्यामध्ये तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यासंदर्भात कंगनाने या समन्सला उत्तर देणं नाकारलं.

यापूर्वी या प्रकरणात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना तपासणीसाठी अधिक वेळ दिला होता. गेल्यावर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृतयूनंतर एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी जावेद यांना कंगनाने केलेली टीप्पणी निराधार असून तिच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकला.

हे वाचलं का?

    follow whatsapp