मराठी सिनेमा इंडस्ट्रीमधील क्यूट कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. प्रिया आणि उमेश यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही फार छान आहे. तर उमेश आणि प्रिया यांची जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रिनवर दिसणार आहे. प्रिया आणि उमेश यांची ‘…आणि काय हवं’ या सिरीजचा तिसरा सिजन येणार आहे.
‘…आणि काय हवं’ या वेब सिरीजच्या तिसऱ्या सिजनच्या शूटींगला सुरुवात करण्यात आली आहे. उमेशने स्वतः सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. उमेशने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटलंय, अखेरीस शूटींगला सुरुवात झालेली आहे…आणि काय हवं?…Season 3.
‘…आणि काय हवं’ सिरीजमध्ये प्रिया आणि उमेश हे जुई आणि साकेतची भूमिका साकारतायत. यापूर्वी या सिरीजचे दोन सिजन रिलीज करण्यात आले आहेत. तर आता तिसऱ्या सिजनच्या शूटींगलाही सुरुवात करण्यात आली असून लवकरच या सिरीजचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आणि काय हवं?’च्या तिसऱ्या सिझनमध्ये जुई आणि साकेतची कोणती गोष्ट असणार आहे याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सिरीज पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत.