सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा 'हा' फोटो तुफान व्हायरल

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा 'हा' फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चर्चा तिच्या अभिनयामुळे आणि सिनेमांमुळे झाली तेवढीच झाली ती सुकेश चंद्रशेखरमुळे. सुकेश चंद्रशेखर हा कुख्यात खंडणीखोर आहे. जॅकलिनच्या आयुष्यात तो मोठ्या खुबीने आला. आता पुन्हा एकदा या दोघांच्या एका व्हायरल झालेल्या फोटोची चर्चा होते आहे. या फोटोमध्ये या दोघांची जवळीक किती आहे ते लख्खपणे दिसतं आहे.

फोटो-इंडिया टुडे

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघांची जवळीक स्पष्ट दिसते आहे. bolly.trending या इंस्टा पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट झाल्यापासूनच प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोच्या खाली अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स लिहिल्या आहेत.

सुकेश जॅकलिनच्या आयुष्यात कसा आला?

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.

जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे.

हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश राजकुमारीसारखं वागवत होता

जॅकलिन आणि शेखऱ उर्फ सुकेश चंद्रशेखर जवळ येत गेले तसे तो जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट देऊ लागला. या भेटींची किंमत कोट्यवधी रूपये होते. सुकेशने आत्तापर्यंत जॅकलिनला सात कोटी रूपयांची गिफ्ट दिली आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे.

या भेटवस्तूंमध्ये बिर्किन बॅग, Chanel, Gucci, YSL या ब्रांडचे कपडे, हर्मीस ब्रांडच्या बांगड्या, टिफनी ब्रांडचं ब्रेसलेट, अंगठ्या, झुमके यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर रोलेक्स, रोजर डुबईस, फ्रेंक मुलर या ब्रांडची घड्याळं देऊनही जॅकलिनचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुकेशने केला. फक्त जॅकलिनलाच नाही तर तिच्या कुटुंबीयांनाही गिफ्ट देण्यात आली. तिच्या आईला एक पोर्श आणि मासेराती कार सुकेशने भेट म्ङणून दिली. जॅकलिनने मात्र आपल्या कुटुंबीयांनी गिफ्ट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा 'हा' फोटो तुफान व्हायरल
सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आयुष्यात कधी व कसा आला?

सुकेश एवढा श्रीमंत कसा झाला?

जर एखादी व्यक्ती जन्माने श्रीमंत नसेल तर ती व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते. अनेक आडमार्गाचे प्रयत्न सुकेशनेही केले त्यामुळेच त्याला अटक झाली. सुकेशला अटक झाली पण तो काही साधासुधा कैदी नव्हता. तुरुंगात त्याने आपलं साम्राज्य उभं केलं. खंडणी वसुलीचं काम सुकेश तुरुंगात राहून करत होता. इथे एंट्री होते ती रॅनबॅक्सीचा माजी प्रमोटर शिविंदर सिंह याची. शिविंदर फसवणूक प्रकरणात आणि इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात असल्याचं कळलं.

शिविंदरला तुरुंगातून बाहेर पडायचं होतं आणि त्याच्या पत्नीला लवकर त्याला घरी आलेलं बघायचं होतं. याचाच फायदा सुकेश चंद्रशेखरने उचलला. सुकेशने 15 जूनला शिविंदरच्या पत्नीला म्हणजेच आदिती सिंहला फोन केला. त्यावेळी मी सरकारी अधिकारी बोलत असल्याचं त्याने सांगितलं. तसंच आदिती सिंहला तो हे पटवून देत होता की मी शिविंदरला तुरुंगातून बाहेर काढू शकतो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in