Arshad Warsi: ‘मुन्नाभाई’तील सर्किटच्या खऱ्या आयुष्याची कहाणी वाचून तुमचाही फ्यूज उडेल!
अरशदने मुन्नभाई एमबीबीएस, धमाल, जॉली एलएलबी, गोलमाल, इश्किया यांसारख्या अनेक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, क्वचितच लोकाना हे माहिती आहे की, त्याला लहानपणापासून खूप संघर्ष दु:ख झेलावे लागले आहे. चला त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

Bollywood : Arshad Warsi Birthday Special : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील सर्किट आजही सर्वांना आठवतो. ही भूमिका साकारली होती अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi). त्याचा बुधवारी (19 एप्रिल) 55 वा वाढदिवस आहे. अरशदने आजपर्यंत प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे. पण, यामागे त्याने इथपर्यंत पोहचण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. अरशदने मुन्नभाई एमबीबीएस, धमाल, जॉली एलएलबी, गोलमाल, इश्किया यांसारख्या अनेक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, क्वचितच लोकांना हे माहिती आहे की, त्याला लहानपणापासून खूप दु:ख झेलावे लागले आहे. चला त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेऊयात.
एकेकाळी सेल्समॅन म्हणूनही केले होते काम!
मुंबईत मुस्लिम कुटुंबात जन्म झालेल्या अर्शद वारसीला लहानपणापासूनच अडचणींचा सामना करावा लागला होता. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी आई-वडिलांचा गमावल्याने त्याला 10वी नंतर शाळा देखील सोडावी लागली होती. यानंतर त्याला मुंबईत राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागलेली. घर चालवण्यासाठी अर्शदला 17व्या वर्षी काम करावे लागले. तो घरोघरी जाऊन कॉस्मेटिक्स सामान विकायचा. यानंतर त्याने फोटो लॅबमध्ये काम केले. यादरम्यान, त्याला अकबर सामीच्या डान्स ग्रुपमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिथून त्याचा नवा प्रवास सुरू झाला.
हे ही वाचा>> Pawar Vs Raut : ‘वकिली’ लागली जिव्हारी! संजय राऊत अजित पवारांना भिडले
पहिल्यांदा अर्शदला महेश भट्टच्या काश या चित्रपटात कोरियोग्राफर म्हणून ब्रेक मिळाला. यानंतर त्याने काही मागे वळून पाहिले नाही. अर्शदने लंडनमधील एक डान्स स्पर्धा जिंकली आणि ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकची कोरियोग्राफी करण्याची संधी त्याला मिळाली. यानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट ‘तेरे मेरे सपने’मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. अर्शद वारसीने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले, परंतु त्याला खरी ओळख 2003 साली आलेल्या संजय दत्तसोबतच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटामधून मिळाली.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील आपल्या जबरदस्त अभिनयाने अर्शद प्रसिद्धीच्या झोतात…
बॉलिवूड इंडस्ट्रीत अर्शद वारसी गेल्या 36 वर्षांपासून काम करत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपट केले, पण जेवढे यश मिळायला हवे होते तेवढे त्याला कधीच मिळाले नाही. त्यानंतर 2003 मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आला, ज्यामध्ये त्याने सर्किटची भूमिका केली होती. अर्शदचे हे पात्र सर्वांनाच आवडते. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट मिळाला नसता तर त्याचे करिअर संपले असते, असे अर्शदने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते. यानंतर अरशदचे अनेक मल्टीस्टारर कमर्शिअल हिट चित्रपट आले, ज्यांनी अभिनेत्याला एक नवी ओळख मिळाली.









