विजय तेंडुलकरांच्या ‘या’ नाटकाला बजरंग दल करतंय विरोध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

( छत्तरपूर,मध्यप्रदेश: लोकेश चौरसिया ) सामाजिक रूढींचा,प्रस्थापित समजुतींचा आपल्या लिखाणातून कायम विरोध करणाऱ्या प्रख्यात लेखक,नाटककार विजय तेंडुलकरांच्या नाटकांना आजही भारतात विरोध होतोय ही एक शोकांतिकाच आहे. नुकतंच मध्यप्रदेशमधील छत्तरपुरमध्ये ही घटना घडली आहे. विजय तेंडुलकरांनी १९८२ मध्ये लिहिलेल्या पाहिजे जातीचे या नाटकाचा हिंदी अनुवाद असलेलं जाती ही पूछो साधू की या नाटकाचा प्रयोग इप्टा या नाटयसंस्थेकडून छत्तरपुर नगरपालिकेतर्फे २८ फेब्रुवारीला तेथील नाट्यगृहात होणार होता. मात्र या नाटकाच्या नावाला विरोध करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाचा प्रयोग झाल्यास शहरात उग्र आंदोलन करू असं पत्र छत्तरपूरच्या कलेक्लटरना दिलं आणि त्यानंतर या नाटकाचा आणि त्याचबरोबर याच महोत्सवात सादर होणाऱ्या बेशर्ममव या नाटकाचा प्रयोगही रद्द करण्याचे आदेश छत्तरपूरचे सीएमओ ओमपाल सिंग भदौरिया यांनी तात्काळ दिले.

छत्तरपूरमध्ये २६ ते २ मार्च दरम्यान शंखनाद राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात इप्टाचे कलाकार २८ फेब्रुवारीला विजय तेंडुलकरांचं जाती ही पूछो साधू की या नाटकाचा प्रयोग सादर करणार होते. या महोत्सवाची जाहिरात प्रसारित झाल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नाटकाच्या नावावरून आक्षेप घेत, हा प्रयोग या महोत्सवात होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आणि कलेक्टरकडे या महोत्सवातील दोन नाटकं रद्द करा नाहीतर शहरात आंदोलन करू असा इशारा देणारं पत्र दिलं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इप्टा नाट्यसंस्थेने मात्र या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बजरंग दलाच्या आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नाटकाचं फक्त नाव पाहून विरोध करत आहेत. नाटकाची पूर्ण संहिता जर वाचली तर त्यात कोणत्याही जाती,धर्माला दुखावण्याचा किंवा आक्षेपार्ह वाटण्यासारखं काही एक नसल्याचं इप्टातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. या नाटकाचे प्रयोग आम्ही खजुराहो आणि अनेक ठिकाणी यापूर्वी केले असून अचानक बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या विरोधामुळे नाटक करण्याची परवानगी प्रशासनाकडून नाकारण्यात आल्याने आम्ही हा प्रयोग त्या ठिकाणी करू शकलो नाही

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हा नाट्य महोत्सव आता पार पडला असला तरी चुकीच्या पध्दतीने प्रख्यात लेखक विजय तेंडुलकरांच्या नाटकाला करण्यात आलेल्या विरोधामुळे आणि रद्द झालेल्या प्रयोगामुळे इप्टाचे कलाकार आणि नाट्यकर्मींमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने नाटकाच्या प्रयोगाला होणाऱ्या विरोधाला न जुमानता महोत्सवाला सुरक्षा देऊन नाट्यमहोत्सव यथोचित पार पाडण्याची गरज होती अशी चर्चा नाट्यकर्मींमध्ये आता बोलली जात आहे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT