Bigg Boss 17 Season : एन्ट्रीला ईशा आणि अभिषेकमध्ये झाली ‘तू-तू-मैं-मैं’
bigg boss 17 isha and abhishek : बिग बॉस १७ च्या घरात प्रवेश करताच इशा आणि अभिषेकने जुन्या गोष्टी काढल्या. दोघांनी सुरुवातीलाच एकमेकांवर आरोप केले.
ADVERTISEMENT

‘नमस्ते, आदाब, सत श्री अकाल, केम छो मजा मा… ‘बिग बॉस 17′ के शो में आप सभी का स्वागत है.’ सलमानच्या आवाजातील हे शब्द ऐकण्यासाठी सगळेच आतुर होते. अखेर प्रतीक्षा संपली आणि बॉलिवूडचा भाईजान वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ घेऊन आला. स्पर्धकांनी एक एक करून खोलीत प्रवेश केला. या यादीत मुनाव्वर फारुकी, अनुराग डोवाल, अंकिता लोखंडे, विकी जैन, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मन्नारा चोप्रा, जिग्ना व्होरा, फिरोजा खान, सना रईस खान, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, नावेद सोल, सोनिया बन्सल आणि सनी आर्या यांचा समावेश आहे. (Isha Malviya and Abhishek, Both the contestants entered Salman’s show by giving dance performances)
हा सीझन खूप खास असणार आहे, कारण शोच्या थीमपासून ते टास्कपर्यंत सर्व काही वेगळं आणि नवीन असणार आहे. यावेळी स्पर्धकांना केवळ स्ट्रॅटजी आखून चालणार नाही, तर मन, मेंदू आणि ताकदीने खेळावं लागणार आहे. हा सीझन स्पर्धकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. आणि हे सर्व पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
ईशा मालवीय आणि अभिषेकने दमदार नृत्याने प्रवेश केला
दोन्ही स्पर्धकांनी डान्स परफॉर्मन्स देत सलमानच्या शोमध्ये प्रवेश केला. याआधी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. दोघांनी सलमानसमोर एकमेकांना एक्सपोज केले. अभिषेक म्हणाला, ईशाने माझ्या चेहऱ्यावर नखं मारली आहेत. तर इशाने अभिनेत्यावर वेगवेगळे आरोप केले. सगळं ऐकून सलमानला खूप विचित्र वाटत होतं.
हेही वाचा >> Bigg Boss 17 : 3 घरांमध्ये विभागलं बिग बॉस, मुनव्वर फारुकीची एन्ट्री ठरली खास
First Impression : Both are doing drama for footage – it totally looks scripted.#BiggBoss17 #BB17 #AbhishekKumar#IshaMalviya #MunawarFaruqui#AnkitaLokhande #BiggBoss17_TAK#AnuragDobhal #SunnyAryapic.twitter.com/XmAXw04ily
— #BiggBoss17_Tak (@BiggBoss17_Tak) October 15, 2023