अमिताभ बच्चन Project K शूटिंगदरम्यान दुखापत; श्वास घ्यायला होतोय त्रास

मुंबई तक

Amitabh Bachchan Injured : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अॅक्शन (Action) सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द (Cancelled) करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Big B is under doctor’s care. He is […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Amitabh Bachchan Injured : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अॅक्शन (Action) सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द (Cancelled) करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Big B is under doctor’s care. He is undergoing treatment.

Amitabh Bachchan : ‘बिग बीं’चा आवाज, फोटो, नाव वापरणं महागात पडेल, उच्च न्यायालयानेच दिले आदेश

बरगडीला दुखापत

या अपघाताची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट ‘के’च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचे अभिनेत्याने सांगितले. अॅक्शन सिनदरम्यान ही घटना घडली. अमिताभ यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. अमिताभ यांनी सांगितले की उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचा बाजूचा स्नायू फाटला आहे. दुखापतीनंतर शूटिंग थांबवण्यात आली. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. तपासणीनंतर बिग बी घरी परतले आहेत. डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी करून विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

श्वास घेण्यास अडचण

अमिताभ बच्चन सध्या वेगवेगळ्या त्रासातून जात आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना खूप त्रास होत आहे. तसेच हालचाल आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. बिग बींना पूर्णपणे सावरण्यासाठी थोडा कालावधी लागेल. त्यांना औषधे देण्यात आली आहेत. डॉक्टरांनी काही पेन किलर देखील दिले आहेत, ज्यामुळे त्यांना वेदना कमी होऊ शकतात. सध्या डॉक्टर त्यांची योग्य ती निगा राखत आहेत. अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp