Emergency : कंगनाच्या सिनेमात मिलिंद सोमण दिसणार सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या इमर्जन्सी (emergency) सिनेमाबद्दल सध्या बोललं जातंय. या सिनेमात कंगना रणौतने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची दिसणार आहे. कंगनाच्या इमर्जन्सी (emergency) सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आलीये. या सिनेमात अभिनेता मिलिंद सोमण फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. सॅम मानेकशॉ यांच्या वेशभूषेतील पोस्टर समोर आलं असून मिलिंद सोमणचा लुक हुबेहूब जुळून आलाय. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या इमर्जन्सी (emergency) सिनेमाबद्दल सध्या बोललं जातंय. या सिनेमात कंगना रणौतने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची दिसणार आहे. कंगनाच्या इमर्जन्सी (emergency) सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आलीये. या सिनेमात अभिनेता मिलिंद सोमण फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. सॅम मानेकशॉ यांच्या वेशभूषेतील पोस्टर समोर आलं असून मिलिंद सोमणचा लुक हुबेहूब जुळून आलाय.

अभिनेता अनुपम खेर आणि मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे नंतर आता कंगना रनौतच्या सिनेमात मिलिंद सोमनची एन्ट्री झालीये. इमर्जन्सी सिनेमातील मिलिंद सोमणचा लुक बघून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.

एमर्जन्सी (emergency) सिनेमातील लुक बघून मिलिंद सोमण या भूमिकेतून चाहत्यांना भूरळ पाडणार असंच दिसतंय. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नायक होते. त्यामुळे मिलिंद सोमणची सॅम मानेकशॉ यांची एमर्जन्सी सिनेमातील भूमिका बघण्यासारखी असणार आहे.

मिलिंद सोमणला फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका देण्याबद्दल अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, मिलिंद सोमणचं अभिनयातील गुणवत्ता बघता, तो सॅम मानेकशॉ भूमिकेसाठी परिपूर्ण वाटला.’

हे वाचलं का?

    follow whatsapp