शमिता शेट्टी राकेश बापटचं ब्रेकअप; दोघेही म्हणाले, 'आता आम्ही सोबत नाही'

Shamita Shetty-Raqesh Bapat Breakup : गेल्या काही दिवसांपासून राकेश आणि शमिताचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू होती, त्यानंतर आता दोघांनी यावर खुलासा केलाय...
shamita shetty and raqesh bapat breakup
shamita shetty and raqesh bapat breakup

बिग बॉस ओटीटी मध्ये एकमेकांच्या जवळ आलेल्या शमिता शेट्टी आणि राकेश बापटच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आलीये. गेल्या काही दिवसांपासून राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. त्यावर आता दोघांनी शिक्कामोर्तब केलंय.

बिग बॉस ओटीटी मध्ये सर्वांची मनं जिंकणाऱ्या राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ब्रेकअप झाल्याची माहिती दिली आहे.

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची रोमँटिक लव्हस्टोरी करण जोहर होस्ट करत असलेल्या बिग बॉस ओटीटी या शोमधून सुरू झाली होती. रिआलिटी शोमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापटची मैत्री झाली होती. त्यानंतर हळूहळू दोघे जवळ येत गेले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.

shamita shetty and raqesh bapat breakup
अहो ऐका ना ! Bigg Boss च्या घरात शमिता शेट्टीने मराठमोळ्या अंदाजात काढली राकेश बापटची आठवण

बिग बॉस ओटीटी शो संपल्यानंतरही शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या लव्हस्टोरीचे किस्से चर्चिले जात होते. दोघेही सोबत फिरताना दिसत होते. सोशल मीडियावरही राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करायचे.

गेल्या काही दिवसांपासून शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचं रिलेशनशिप संपण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यानंतर दोघांनीही त्या फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ब्रेकअफ झाल्याचा खुलासा केला आहे.

राकेश बापट आणि शमिता शेट्टी ब्रेकअपबद्दल काय म्हणाले?

राकेश बापट म्हणाला, सगळ्यांना सांगू इच्छितो की, मी आणि शमिता आता सोबत नाहीये. नियतीने आमचे मार्ग खूपच विचित्र स्थितीत आणले आहेत. खूप साऱ्या प्रेमासाठी शारा (शमिता-राकेश) परिवाराचे खूप आभार. हे कळल्यानंतर तुमची मनं दुखावली गेली असेल, याची मला जाणीव आहे. तरीही तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहाल अशी अपेक्षा करतो. कायम तुमच्या पाठिंब्याची गरज असेल, असं राकेश बापटने म्हटलेलं आहे.

राकेश बापटसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती देताना शमिता शेट्टी म्हणाली, 'मला वाटतं की, स्पष्ट करण्याची गरज आहे. राकेश आणि मी आता सोबत नाही आहोत आणि हे मागील बऱ्याच काळापासून असं आहे.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in