Aishwarya-Abhishek यांच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण...
Aishwarya Rai-Abhishek Bachchan : काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची खूप चर्चा होत आहे. ते दोघं घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 17 वर्षात असं काय बदललं, जे लोकांनी नोटीस केलं याविषयी जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
17 वर्षांत अभिषेक-ऐश्वर्याचे नाते किती बदलले?
सासू जया बच्चन यांच्यासोबतचं नातं खरंच बदललं?
श्वेता बच्चनला बंगला गिफ्ट केल्याने ऐश्वर्या नाराज?
Aishwarya Rai And Abhishek Bachchan : “आतापर्यंत त्यांना जसा आदर मिळाला आहे तसाच मलाही हवाय. मला जया बच्चन सारखं व्हायचंय…” हे विधान ऐश्वर्या रायचं आहे. एका जुन्या मुलाखतीत तिने आपल्या सासूसारखं बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या सासू जया बच्चन यांचा हात धरून त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेली दिसत आहे. हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा सासू आणि सुनेचे खूप चांगले बाँडिंग होते. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलताना दिसत आहे. बच्चन कुटुंबाची फॅन फॉलोइंग मजबूत आहे, प्रत्येकाचे चाहते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतात. अशावेळी काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची खूप चर्चा होत आहे. ते दोघं घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 17 वर्षात असं काय बदललं, जे लोकांनी नोटीस केलं याविषयी जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
सध्या ऐश्वर्या राय बच्चन दुबईत आहे. ती मुलगी आराध्यासोबत SIIMA अवॉर्ड्समध्ये पोहोचली आहे. याआधी आराध्या बच्चनलाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. पण ऐश्वर्याच्या एका गोष्टीने सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे तिची वेडिंग रिंग... लोकांना ऐश्वर्या रायच्या हातात वेडिंग रिंग दिसली नाही, त्यानंतर त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. याआधी अभिषेकच्या हातातील वेडिंग रिंगही गायब दिसली होती, पण नंतर त्याच्या हातात ती दिसली आणि फ्लाँट करत त्याने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. पण बच्चन कुटुंबात अशा गोष्टी वारंवार पाहायला मिळत आहेत, त्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा-पुन्हा उधाण येत आहे.
हेही वाचा : Gold Rate : बाईईई! आज सोनं स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत मोठे बदल
17 वर्षांत अभिषेक-ऐश्वर्याचे नाते किती बदलले?
अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न 2007 मध्ये झालं. सोशल मीडियावर दोघंही खूप सक्रिय असतात. ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक बच्चनसोबत अनेकदा फोटो शेअर करते. हे फोटो एकतर कौटुंबिक कार्यक्रमांचे किंवा एकत्र घालवलेल्या खास क्षणांचे असतात. सहा महिन्यांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. तिला तिच्या कुटुंबासोबत अनेकवेळा इव्हेंट्समध्ये पाहिले गेले आहे, परंतु विशेष बाँडिंग दिसले नाही. अभिषेक बच्चनने अखेरचा ऐश्वर्या रायचा फोटो 9 महिन्यांपूर्वी तिच्या वाढदिवशी शेअर केला होता.
हे वाचलं का?
सासू जया बच्चन यांच्यासोबतचं नातं खरंच बदललं?
ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातलं सुंदर बॉन्डिंग अनेकदा पाहायला मिळालं. ऐश्वर्या रायच्या बाजूनेही गोष्टी चांगल्या होत्या. त्याचवेळी जया बच्चन यांनी आराध्या बच्चनच्या संगोपनासाठी आपल्या सुनेचेही कौतुक केले. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या ऐश्वर्यावर खूप प्रेम करतात. पण आता मीडियासमोर दोघीही एकमेकांबद्दल बोलणं टाळतात.
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत पावसाची उघडीप! 'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा; पाहा IMD अलर्ट
अंबानींच्या लग्न समारंभात ऐश्वर्या लेकीसोबत एकटीच दिसली
अलीकडेच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब चर्चेचा विषय ठरला. जेव्हा ऐश्वर्या आपल्या लेकीसोबत एकटीच दिसली. संपूर्ण कुटुंब एका बाजूला आणि ऐश्वर्या-आराध्या दुसऱ्या बाजूला होते. त्यामुळे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांना आणखीनच खतपाणी मिळाले. त्यांचे व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. किमान अभिषेकने ऐश्वर्यासोबत असायला हवं होतं असं चाहते म्हणाले. मात्र, फंक्शनच्या इनसाइड फोटोंमध्ये दोघंही एकत्र दिसले होते.
ADVERTISEMENT
श्वेता बच्चनला बंगला गिफ्ट केल्याने ऐश्वर्या नाराज?
ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांच्यातील संबंध चांगले नव्हते हे सुरुवातीपासूनच दिसते. अलीकडेच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मुलगी श्वेता हिला जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला भेट म्हणून दिला. या बातमीनंतर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात होतं की, ऐश्वर्या राय या निर्णयावर नाराज आहे. मात्र कुटुंबाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT