Aishwarya Rai : अभिषेकने 'घटस्फोटाची पोस्ट' लाईक केल्यानंतर पहिल्यांदाच बोलली ऐश्वर्या राय

मुंबई तक

ADVERTISEMENT

 aishwarya rai bachchan and abhishekh bachchan divorce rumour first reaction on aishwarya aaradhya bachhcan spot in airport bollywood news
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Bachchan) घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घटस्फोटाच्या चर्चांवर आता ऐश्वर्या रायची प्रतिक्रिया समोर

point

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या न्युयॉर्कला होती.

point

आता ती भारतात परतल्यानंतर एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Bachchan) घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू आहे. या घटस्फोटाच्या चर्चांवर आता ऐश्वर्या रायची प्रतिक्रिया समोर आल्याची माहिती आहे. खरं तर या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या न्युयॉर्कला होती. त्यानंतर आता ती भारतात परतल्यानंतर एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी ऐश्वर्याने पापाराझीसमोर प्रतिक्रिया दिली आहे.  

ADVERTISEMENT

गेल्या अनेक आठवड्यांपासून बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. यामागच कारण म्हणजे मध्यंतरी अभिषेक बच्चनने घटस्फोटाची एक पोस्ट लाईक केली होती. ही पोस्ट नेमकी काय होती? हे पाहूयात.  

घटस्फोटाची ती पोस्ट? 

'घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना एका वृद्ध जोडप्याचा हात धरून तो हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवायचा आहे? तरीही कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते,पण अनेक दशके एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग लहान-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असताना ते कसे सहन करतात? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?

हे वाचलं का?

हे ही वाचा : Viral Video News : सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा

अभिषेक बच्चनने ही पोस्ट लाईक केली. ज्यानंतर लोक आता याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दरम्यान या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसोबत न्युयॉर्कला वेकेशनवर गेली होती. आता ती वेकेशनवरून परतल्यानतर तिने घटस्फोटावर भाष्य केलं आहे. 

ADVERTISEMENT

खरं तर ऐश्वर्या आणि आराध्या मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला होत्या. यावेळी पापाराझींनी त्यांना फोटोसाठी थांबवलं होतं. फोटो काढून झाल्यानंतर पॅप्सनी ऐश्वर्याला गुड मॉर्निग ग्रीड केलं. आणि मॅम तुम्ही कशा आहात? असा प्रश्न केला. या प्रश्वावर ऐश्वर्या हसली आणि तिने सगळं काही ठीक आहे. धन्यवाद, अशी प्रतिक्रिया दिली. ऐश्वर्याच्या या प्रतिक्रियेनंतर आता खरंच दोघांमध्ये घटस्फोट होणार आहे की, या नुसत्या अफवा आहेत, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Anil Deshmukh : "...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी 'तो' रिपोर्ट दडवून ठेवलाय"

दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT