Ambani Family Announce Mass Wedding : अनंत-राधिका यांच्याआधी अंबानी कुटुंब 'यांचे' करणार लग्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

ambani family announces mass wedding on underprivileged couple as part pf anant ambani radhika merchant pre wedding palghar
विवाह सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून आणखीण एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
social share
google news

Anant Ambani Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध  उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा रांधिका मर्चट यांच्याशी होणार विवाह सोहळा हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या विवाह सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून आणखीण एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची आता एकच चर्चा रंगली आहे.  (ambani family announces mass wedding on underprivileged couple as part pf anant ambani radhika merchant pre wedding palghar) 

मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी शाही विवाह सोहळ्याआधी पालघरध्ये सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात वंचित जोडप्यांचे लग्न पार पडणार आहेत. हा सामुहिक सोहळा उद्या 2 जुलै 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे पार पडणार आहे. एकीकडे शाही विवाह सोहळा आणि दुसरीकडे सामाजिक भान जपण्याच काम या निमित्ताने अंबानी कुटुंब करताना दिसत आहे. 

हे ही वाचा : Lonavala Bhushi Dam : पिकनिक बेतली जीवावर, कुटुंबच गेले वाहून; व्हिडीओची संपूर्ण स्टोरी

विशेष म्हणजे पालघरमधील हा सामुहिक विवाह सोहळा अनंत अंबानी आणि राधीका मर्चट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा भाग असणार आहे. अशी माहिती अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. या सामुहिक लग्न सोहळ्याला संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित राहणार आहेत. या लग्न सोहळ्याची पत्रिकाही समोर आली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा उद्योगपती विरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंटशी 12 जुलै 2024 रोजी होणार आहे. हा भव्य लग्न समारंभ वांद्रे कुर्ला येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये होणार आहे. या लग्नाची आता अंबानी कुटुंबियांना आता उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा : गॅस सिलिंडरच्या दरात कपात, महाराष्ट्रात नवे दर किती?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT