Lonavala Bhushi Dam : पिकनिक बेतली जीवावर, कुटुंबच गेले वाहून; व्हिडीओची संपूर्ण स्टोरी

मुंबई तक

Lonavala Bhushi Dam Video : लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. फिरायला आलेले एक कुटुंब पाण्यात वाहून गेले. यात जीवितहानीही झाली आहे. 

ADVERTISEMENT

भूशी डॅम परिसरात एका कुटुंबातील 9 ते 10 जण वाहून गेले.
भूशी डॅम परिसरात पाण्यात वाहून गेलेले ते 9 ते 10 जण कोण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भूशी डॅम परिसरात दुर्दैवी घटना

point

भूशी डॅम परिसरात कुटुंबातील 9 ते 10 जण वाहून गेेले

point

भूशी डॅम परिसरातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Lonavala Bhushi Dam Accident : (कृष्णा पांचाळ, लोणावळा) रविवारी (30 जुलै) सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरातील आहे, ज्यात एका कुटुंबातील 9 ते 10 लोक पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. हे कुटुंब कोण आणि ते भूशी डॅम परिसरात कसे आले? (lonavala bhushi dam incident)

लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरात अचानक पाणी वाढल्याने पाण्यात 9 ते 10 जण वाहून गेले. यात 4 आणि 9 वर्षाच्या मुलगाचाही अजूनही शोध घेतला जात आहे. युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. ज्या कुटुंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली, तो पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. 

भूशी डॅम व्हिडीओ : पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यद नगर भागात हे कुटुंब राहते. 16-17 लोक फिरण्यासाठी लोणावळ्याला आले. एक खासगी बस या कुटुंबाने फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp