Pankaj Udhas: प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

मुंबई तक

Pankaj Udhas Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज (26 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ADVERTISEMENT

पंकज उधास यांचं निधन
पंकज उधास यांचं निधन
social share
google news

Singer Pankaj Udhas Passed Away: मुंबई: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचं आज (26 फेब्रुवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांची मुलगी नायब उधास हिने आपल्या वडिल्यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलं आहे. (famous bollywood singer pankaj udhas passed away)

पंकज उधास यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांच्यासारख्या गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांनाही अतीव दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर त्यांना अनेक जण  श्रद्धांजली वाहत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे कुटुंब राजकोटजवळील चरखाडी नावाच्या गावचे होते. त्यांचे आजोबा जमीनदार आणि भावनगर संस्थानाचे दिवाणही होते. त्यांचे वडील केशुभाई उधास हे सरकारी कर्मचारी होते तर, त्यांची आई जितुबेन उधास यांना गाण्याची खूप आवड होती. यामुळेच पंकज उधास आणि त्यांच्या दोन्ही भावांचा संगीताकडे नेहमीच कल होता. 

'चिठ्ठी आयी है' या गझलेने रातोरात मिळाली होती प्रसिद्धी

पंकज उधास यांचे गझल गायनाच्या जगात मोठे नाव आहे. 'चिठ्ठी आयी है' या गझलेने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली होती. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' चित्रपटात या गझलचा समावेश करण्यात आला होता. पंकज यांनी 'ये दिल्लगी', 'फिर तेरी कहानी याद आयी', 'चले तो कट ही जायेगा' आणि 'तेरे बिन' अशा अनेक गझलांना आपला आवाज दिला.

पंकज यांना कोणत्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले?


पंकज उधास यांनी गायनात आपली जबरदस्त छाप सोडली आणि त्यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये 'नाम' चित्रपटातील 'चिठी आयी है' या गाण्यासाठी पद्मश्री (2006), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (2012), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार (1988) यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी एल.एस. गाल पुरस्कार (1985), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (2003) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अकादमी (IIFA) पुरस्कार मिळाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp