मी बॉलिवूड सोडणार होते, कारण…; प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ

मुंबई तक

प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. ताज्या मुलाखतीत प्रियांकाने हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित मोठे सत्य समोर आणले आहे.

ADVERTISEMENT

प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ
प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ
social share
google news

Priyanka Chopra’s disclosure: एकेकाळी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ बनून करोडोंच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांका चोप्राने आता हॉलिवूडमध्येही मोठे नाव कमावले आहे. देसी गर्ल ते ग्लोबल स्टार हा प्रियांकाचा प्रवास अप्रतिम होता. पण प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. ताज्या मुलाखतीत प्रियांकाने हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित मोठे सत्य समोर आणले आहे. तिने या इंडस्ट्रीतील लोकांना टार्गेट केले आहे. (I was going to quit Bollywood because…; Excitement by Priyanka Chopra’s disclosure)

Priyanka Chopra: कुणी लठ्ठ म्हणालं, तर, कुणी भलतचं, प्रियांकाच्या डोळ्यात आलं पाणी

प्रियांकाचा मोठा खुलासा

डॅक्स शेफर्डसोबत ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्ट शोमध्ये प्रियांकाला विचारण्यात आले की, अमेरिकेत काम शोधण्याचं कारण काय? याला उत्तर देताना प्रियांकाने सांगितले की, जेव्हा ती ‘सात खून माफ’ चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा देसी हिट्सच्या अंजुला आचार्यने तिच्याशी एक म्युझिक व्हिडिओ आणि यूएसमध्ये करिअरसाठी संपर्क साधला होता. त्यावेळी प्रियांका बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार ती इंडस्ट्रीतील राजकारणामुळे नाराज होती. म्हणूनच तिला ब्रेक हवा होता.

“प्रियांका चोप्राचा ‘मिस वर्ल्ड’ किताब फिक्सिंग होता”, माजी मिस बार्बाडोस लिलानीच्या आरोपानं खळबळ

हे वाचलं का?

    follow whatsapp