Shah Rukh Khan : पठाणने बाहुबली 2 ला पछाडलं! बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच
Pathaan movie collection: पठाण चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील धुमाकूळ सुरूच आहे. (Shahrukh khan) शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण (Deepika padukon) स्टारर चित्रपट पठाणची सुनामी बॉक्स ऑफिसवर थांबली नाही. या चित्रपटाने रिलीजच्या 38 व्या दिवशी सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. पठाणने बाहुबली 2 (Bahubali 2) हिंदी कलेक्शनला मात दिली आहे. पठाण हा हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा […]
ADVERTISEMENT
Pathaan movie collection: पठाण चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील धुमाकूळ सुरूच आहे. (Shahrukh khan) शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण (Deepika padukon) स्टारर चित्रपट पठाणची सुनामी बॉक्स ऑफिसवर थांबली नाही. या चित्रपटाने रिलीजच्या 38 व्या दिवशी सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. पठाणने बाहुबली 2 (Bahubali 2) हिंदी कलेक्शनला मात दिली आहे. पठाण हा हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 529.96 कोटींवर गेले आहे. Pathaan movie broke bahubali 2 movies record
ADVERTISEMENT
Smriti Irani यांच्या लेकीच्या रिप्शेनशला ‘पठाण’ची हजेरी! Exclusive Photo…
पठाणने बाहुबली 2 ला टाकले मागे
हे वाचलं का?
हिंदीमध्ये बाहुबली 2 चे लाइफटाइम कलेक्शन 511 कोटी होते. पठाण कमाईच्या बाबतीत बाहुबली 2 हिंदीच्या पुढे गेला आहे, त्यामुळे किंग खानच्या चाहते खुश आहेत. बाहुबली 2 च्या कलेक्शनला मागे टाकणे ही छोटी गोष्ट नाही. शाहरुख खानच्या कमबॅक चित्रपटाने ते केले जे इतर कोणत्याही सुपरस्टारने इतक्या वर्षात केले नाही. जगभरात पठाणचा डंका वाजत आहे. या चित्रपटाची जगभरातील कमाई 1026 कोटींवर गेली आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये कोणाचा समावेश आहे?
ADVERTISEMENT
1. पठाण
ADVERTISEMENT
2. बाहुबली 2
3. KGF 2
4. दंगल
Pathaan : स्मृती इराणींनी ‘पठाण’ का पाहिला नाही? सांगितलं हे कारण
जिथे बाजारात येणाऱ्या नवीन चित्रपटांना प्रेक्षक मिळणे कठीण होत आहे, अशा काळात पठाणच्या कमाईचा वेग देश-विदेशात कमी होताना दिसत नाही. सहाव्या आठवड्यात अशी विक्रमी कमाई करणे कौतुकास्पद आहे. पठाण हा भारताचा नंबर 1 हिंदी चित्रपट ठरला आहे. बॉलिवूडसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. किंग खानच्या पठाणने रिलीज झाल्यापासून अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ही मालिका अजूनही सुरू आहे. किंग खान 4 वर्षानंतर परतला आहे. यापूर्वी त्याचे बॅक टू बॅक सिनेमे फ्लॉप झाले होते.
पठाण चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ आनंदने केली आहे. पठाण यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. यामध्ये किंग खानने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. जॉन अब्राहमची भूमिका नकारात्मक आहे. दीपिकाने चित्रपटात खूप ग्लॅमर दाखवले आहे. पुढे पाहू, पठाण आणखी किती विक्रम मोडतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT