"मी सुकेशसोबत...." नोरा फतेहीचा चौकशीदरम्यान मोठा खुलासा

जाणून घ्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला नोरा फतेहीने काय सांगितलं?
What Actress nora fatehi told delhi police about sukesh chandrasekhar and his exploits
What Actress nora fatehi told delhi police about sukesh chandrasekhar and his exploits

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरींग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेख २१५ कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात नोरा फतेहीची दिल्लीतल्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. नोराने आपण डिसेंबर २०२० मध्ये चेन्नईत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती असंही तिने सांगितलं आहे.

मी सुकेशसोबत चॅट करायचे भेटले नाही

तसंच आर्थिक गुन्हे शाखेनेही नोराची चौकशी केली. मनी लाँड्रीग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. गुरूवारी तिला बोलवण्यात आलं होतं. सुमारे सहा तास नोराची चौकशी झाली. मी या सगळ्या प्रकरणात निर्दोष आहे. माझ्या विरोधात कट रचला जातो आहे असं नोराने चौकशीदरम्यान सांगितलं आहे. एवढंच नाही तर मी सुकेशसोबत चॅट करायचे पण त्याला कधीही भेटले नाही असंही नोराने जबाबात सांगितलं आहे.

What Actress nora fatehi told delhi police about sukesh chandrasekhar and his exploits
नोरा विचारतेय, माझ्यासोबत सुट्टीवर येणार का?

नोरा फतेहीने जबाबात काय म्हटलं आहे?

नोरा फतेहीने दिलेल्या जबाबानुसार सुकेशची पत्नी लीना मारियाचा चेन्नईमध्ये स्टुडिओ आहे. मला तिथे कार्यक्रमासाठी बोलवलं गेलं होतं. त्यावेळी मला पैशांच्या ऐवजी BMW कार देत आहोत असं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी लीनाने माझे पती सुकेश तुझे चाहते आहेत असं मला सांगितलं होतं. त्यानंतर सुकेशला फोन करून लीनाने माझं आणि त्याचं बोलणं करून दिलं होतं. त्यानंतर मला लीनाने एक बॅग आणि फोन भेट म्हणून दिला. तसंच BMW कार भेट देण्याचीही घोषमा केली. माझ्याकडे एक बीएमडब्ल्यू कार त्याआधीच होती. त्यामुळे माझ्या चुलत बहिणीचा पती बॉबीला मी ती गिफ्ट केली. ज्याची किंमत ६५ लाख होती असं नोराने सांगितलं.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, अभिनेत्री नोरा फतेहीने चौकशीदरम्यान ईओडब्ल्यूला सांगितले की, "मी कटाला बळी पडले आहे, कट रचणारी नाही". याशिवाय अनेक प्रश्नांना त्यांनी आश्चर्यकारक उत्तरे दिली. जेव्हा नोरा फतेहीला विचारण्यात आले की तिला तामिळनाडूतील एका चॅरिटी इव्हेंटमध्ये कोणी आमंत्रित केले होते.

What Actress nora fatehi told delhi police about sukesh chandrasekhar and his exploits
सुकेश चंद्रशेखरनंतर आता या इटालियन अभिनेत्याला जॅकलिन करतेय डेट? चर्चांना उधाण

प्रतिसादात, अभिनेत्रीने एका अधिकाऱ्याचे नाव झैदीचे नाव दिले आणि दावा केला की झैदी सुपर कार आर्टिस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी एक्सिड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रवर्तक देखील आहेत. याशिवाय त्याच्या प्रवासाचे पैसे आणि इतर खर्चाबाबत विचारले असता, लीना पॉल तिच्या माहितीत असल्याचे नोराने सांगितले.

नोराने ती सुकेशसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करायची हे तिने कबूल केले आहे. मात्र काही महिन्यांनी सुकेश तिला वारंवार फोन करायचा, त्यावेळी तिला शंका आली आणि त्यानंतर तिने त्यासोबत सर्व प्रकारचे संपर्क तोडले. यावेळी नोरा म्हणाली, मला आणि जॅकलिनला सुकेशची ओळख करुन देण्यात त्याची पत्नी जबाबदार आहे.” यानंतर पोलिसांनी तिची आणि लीनाची समोरासमोर बसून चौकशी केली. मात्र त्यावेळी त्या दोघींच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याचे समोर आले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in