Advertisement

सुष्मिता सेन-ललित मोदींच्या ब्रेकअपची चर्चा, सुष्मिता एक्स बॉयफ्रेंडसोबत पार्टीत, फोटो व्हायरल

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन अनेकदा तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असते.
Actress sushmita sen  flaunts engagement Ring in New Photo with ex ipl chairman
Actress sushmita sen flaunts engagement Ring in New Photo with ex ipl chairman फोटो सौजन्य-ट्विटर

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन अनेकदा तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असते. एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिताने ललित मोदीसोबतच्या नात्याची पुष्टी करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पण आता सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.

सुष्मिताच्या लव्ह लाईफने चाहत्यांना गोंधळात टाकले

सुष्मिता सेनच्या लव्ह लाइफमध्ये काय चालले आहे याविषयी चाहते सर्वाधिक गोंधळात पडलेले आहेत. यापूर्वी रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती, मात्र आता ललित मोदीसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान सुष्मिता सेन पुन्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत पार्टी करताना दिसत आहे.

वास्तविक, अलीकडेच ललित मोदी नाही तर सुष्मिताचा एक्स रोहमन शॉल सुष्मिता सेनच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला होता. सुष्मिता आणि रोहमनच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खास गोष्ट म्हणजे सुष्मिता सेनने स्वतः रोहमनसोबतचा फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सुष्मिता आणि रोहमन एकत्र पोज देताना दिसत आहेत.

ललित मोदीसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान सुष्मिता सेनला एक्स बॉयफ्रेंडसोबत पार्टी करताना पाहून चाहतेही गोंधळले आहेत. सुष्मिताच्या लव्ह लाईफमध्ये काय चालले आहे, ते फक्त तीच सांगू शकते. मात्र, ललित मोदींसोबत विभक्त झाल्याच्या वृत्तावर अद्याप अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपची बातमी का व्हायरल झाली?

ललित मोदींनी जेव्हा सुष्मिता सेनसोबतचे नाते अधिकृत केले तेव्हा त्यानी इन्स्टाग्रामवर त्यांचा डीपी आणि बायो बदलला. ललित मोदीनी सुष्मिता सेनसोबतचा प्रोफाईल फोटो टाकला होता. त्याने सुष्मिता सेनबद्दल इंस्टाग्रामवर त्याचे डिस्प्ले पिक्चर (डीपी) आणि बायो बदलले. त्याने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुष्मिता सेनबद्दल लिहिले - मी माझ्या जोडीदारासोबत नवीन आयुष्य सुरू करत आहे. माझी लव्ह सुष्मिता सेन. पण आता ललित मोदींनी इन्स्टाग्रामवरून सुष्मिता सेनसोबतचा प्रोफाईल फोटो हटवला आहे. ललित मोदींनी बायोमधून सुष्मिता सेनसाठी लिहिलेला प्रेमळ मेसेजही काढून टाकला आहे. तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत राहिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in