गौतमी पाटीलने उदयनराजेंना दिलं एक ‘खास’ गिफ्ट, थेट साताऱ्यात जाऊन घेतली भेट!
Gautami Patil and Udayanraje Bhosale: नृत्यांगना गौतमी पाटील हिने थेट साताऱ्यात जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी गौतमीने उदयनराजे यांना एक खास गिफ्ट देखील दिलं.
ADVERTISEMENT

Gautami Patil: सातारा: राज्यातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने आज (16 मे) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील (Satara) जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, गौतमी पाटीलने उदयनराजेंना एक खास भेट देखील दिली. ज्याबाबत तिने स्वत:च माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं. (famous dancer gautami patil met chhatrapati udayanraje bhosale on this occasion she also gifted a special perfume)
गौतमी पाटीलने उदयनराजेंना नेमकं काय गिफ्ट दिलं?
उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली की, ‘महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले.. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले होते.’ असं गौतमी यावेळी म्हणाली. तसेच या भेटीत खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्यूम भेट दिल्याचंही तिने सांगितलं
उदयनराजेंच्या भेटीनंतर गौतमी नेमकं काय म्हणाली?
‘मी पहिल्यांदाच महाराजांना भेटले.. त्यांचा खूप छान स्वभाव आहे आणि खरं तर त्यांना कलाकारांची जाण आहे. म्हणून या गोष्टीचं खूप छान वाटलं. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि कायम सोबत राहावा हीच विनंती करते. त्यासाठी मी आले होते. त्यांना भेटले छान वाटलं..’
‘मी बुके आणला होता राजेंच्या भेटीसाठी.. आणि मला या दादांनी सांगितलं होतं की, उदयनराजेंना परफ्यूम खूप आवडतो. मग मी परफ्यूम घेतला आणि तो उदयनराजेंना दिला.’