Salman Khan: साप चावल्यानंतर कशी आहे सलमान खानची तब्येत? जाणून घ्या हेल्थ अपडेट

Salman Khan: साप चावल्यानंतर कशी आहे सलमान खानची तब्येत? जाणून घ्या हेल्थ अपडेट
health update how is bollywood actor salman khans health after snake bite(फोटो: मुंबई तक)

पनवेल: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला साप चावल्याची बातमी समोर आली त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. सलमान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहत्याचे ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत. साप चावल्यानंतर आपल्या आवडता सुपरस्टारला काहीही होऊ नये यासाठी अनेक प्रार्थना करत असल्याचं दिसून येतंय.

आता कशी आहे सलमानची प्रकृती?

सलमानच्या तब्येतीबाबत त्याचे चाहते खूप चिंतेत आहेत. त्यामुळेच चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, साप चावल्यानंतर आता सलमान खानची तब्येत कशी आहे? नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सलमानची तब्येत आता ठीक असल्याचं सांगितलं जात आहे.

25 डिसेंबरच्या रात्री उशिरा सलमानला साप चावला. तेव्हा त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास सलमानला उपचारासाठी नवी मुंबईतील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सगळ्यात दिलासा देणारी बाब म्हणजे सलमानला चावणारा साप फारसा विषारी नव्हता.

मात्र, तरीही जवळपास 6 ते 7 तास हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची एक टीम त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून होती. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान पूर्णपणे बरा असून त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान याला तपासण्यासाठी लीलावती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर जलील पारकर यांना बोलविण्यात आलं होतं. त्यांनी देखील सलमानला तपासलं. ज्यानंतर सलमानला डिस्चार्ज देण्यात आला.

ख्रिसमस आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान गेला होता फार्म हाऊसवर

25 डिसेंबरला ख्रिसमस आणि 27 डिसेंबरला सलमानचा वाढदिवस आहे. या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून सलमान फार्म हाऊसवर गेला होता. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे यावेळी सलमानने आपला वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर जवळच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. आपल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठीच सलमान फार्म हाऊसवर पोहोचला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल फार्म हाऊसवर मित्रांशी बोलत असताना त्याला त्याच्या हाताला काहीतरी टोचत असल्याचे जाणवले. यानंतर त्याने इकडे-तिकडे नजर फिरवली तेव्हा त्याला साप दिसला. यावेळी साप पाहून स्वत: सलमान खान प्रचंड घाबरला आणि त्याने लागलीच मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.

त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांना मुंबईतील कामोठे येथील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर काही तासांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता सलमानची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

health update how is bollywood actor salman khans health after snake bite
Salman Khan : सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्म हाऊसवर रात्री घडली घटना

नेमकं कसं आहे सलमानचं फार्म हाऊस?

सलमान खानचं पनवेलमध्ये फार्म हाऊस असून, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी आहेत. लॉकडाउनच्या काळात सलमान खान फार्म हाऊसवर राहायला होता. या फार्म हाऊस सलमान खानची छोटी बहीण अर्पिताचं नाव आहे. अर्पिता फार्म असं नाव गेटवरच लिहिलेलं आहे.


इथे स्वतंत्र जिम आहे. त्याचबरोबर घोडस्वारीसाठी ट्रॅकही तयार केलेला आहे. फार्म हाऊसला लागूनच शेती आहे. शेतात काम करतानाचे फोटोही सलमान खान नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

फार्म हाऊस परिसरातच एक मोठी बागही आहे. त्याचबरोबर एक मोठा स्वीमिंग पूलही तयार केलेला आहे. सुटी घालवण्यासाठी सलमान खान नेहमी फार्म हाऊसवर येत असतो. वाढदिवस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान खान फार्म हाऊस आलेला असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in